आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात बाप- लेकावर कोयत्याने वार:पाण्याचा फुगा मारल्याचा जाब विचारल्याने केला हल्ला, तीन मुलांवर गुन्हा दाखल

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील काळेवाडी परिसरातील एका तरुणावर तीन अनोळखी मुलांनी पाण्याचा फुगा मारला. याचा जाब विचारला असता बापलेकावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे.भारतमाता चाैका जवळील रस्त्यावर झालेल्या या हल्ल्यात बापलेक गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी अनाेळखी तीन मुलांवर वाकड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी साेमवारी दिली.

या घटनेनंतर अभिषेक हाैसराव बचाटे (वय-20,रा.काळेवाडी,पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. ही घटना 4 मार्च रोजी रात्री 9.15 वाजता घडली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी तक्रारदार अभिषेक बचाटे हे तापकीर चाैक, काळेवाडी येथून घरी पायी चालत जात हाेते. यावेळी अनोळखी तीन व्यक्तींपैकी एकाने त्यांच्या पाठीमागून पाण्याने भरलेला पिशवीचा फुगा फेकून मारला. त्यामुळे त्याने मागे फिरुन त्याबाबत आराेपींना जाब विचारला. या गाेष्टीचा राग येऊन आराेपींनी त्यांना धक्काबुक्की करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

कोयत्याने हल्ला करून पसार

बापलेकांचा ओरडण्याचा आवाज ऐकून तेथे रहात असणारे त्यांचे मामा नितीन प्रभाकर पवार व वडील हाैसराव बचाटे हे मुलास वाचविण्यास आले. यावेळी आरोपींमधील एका तरुणाने वडीलांवर काेयत्याने वार केला. त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी मुलगा अभिषेक मध्ये पडला असता, आराेपीने त्याच्यावर देखील वार केले. कोयत्याने वार करून आरोपी दुचाकीवरून फरार झाले. या घटनेचा पुढील तपास वाकड पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...