आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:सूतगिरणीची जमीन विक्री करण्याच्या बहाण्याने व्यवसायिकाची पाच कोटी रुपयांची फसवणूक

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर येथील एक सहकारी सूतगिरणी लिलावात घेतल्यानंतर, संबंधित सूतगिरणी आणि सूतगिरणीची जमीन पुण्यातील एका व्यवसायिकाला विक्री करण्याच्या बहण्याने पाच कोटी रुपये घेऊन आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी आरोपींवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

मे आयबीए एंटरप्राईजेसचे संचालक अब्दुल करीम झाका (राहणार -आगरी पाडा, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत प्रशांत ओम प्रकाश भंडारी (वय -47, राहणार- कॅम्प, पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार जानेवारी 2006 ते मे 2023 यादरम्यान घडलेला आहे

नक्की कशी झाली फसवणूक?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अब्दुल करीब झाका यांनी सोलापूर येथील लिलावाच्या सहकारी सूतगिरणी लि. व यशवंत सहकारी सूतगिरणीची जमीन प्रशांत भंडारी यांना विक्री करण्याचे आमिष दाखवले. या सुतगिरणीची जमीन प्रशांत भंडारी यांच्या नावे करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पाच कोटी रुपये घेतले. सूतगिरण्यांचे खरेदीखत प्रशांत भंडारी यांच्या कंपनीशिवाय दुसऱ्या कंपनीच्या नावे करून घेतलेले पैसे परत न देता आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस धनवडे पुढील तपास करत आहे.