आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:सहकार मंत्र्यांचा सचिव असल्याचे सांगत 59 लाख रुपयांची फसवणूक, लिलावातील घर परत मिळवण्याचा बहाणा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे सचिव असल्याचे खोटे सांगत लिलाव झालेले घर परत मिळवून देतो असे सांगत तब्बल 59 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन आरोपींवर येरवडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली आहे.

गोरख तनपुरे( वय -), विशाल पवार( वय- 35 ),गगन केशव राहांडगळे (वय- 38 )अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.याबाबत आरोपीं विरोधात येरवडा पोलिसांकडे प्रशांत प्रताप अहिर (वय- 59, राहणार- येरवडा, पुणे )यांनी तक्रार दाखल केली आहे.

नक्की प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,आरोपी गोरख तनपुरे आणि विशाल पवार यांनी तक्रारदार प्रशांत आहिर यांना गगन राहांडगळे याच्याशी ओळख करून दिली. सदर ओळख करून देताना संबंधित दोन आरोपींनी गगन हा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे सचिव असल्याचे खोटे सांगितले. प्रशांत आहिर यांचे एचडीएफसी बँकेचे गृह कर्ज कमी करून देतो तसेच त्यांचे लिलाव झालेले घर त्यांना परत मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून आरोपींनी वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे घेतले.

आरोपींनी आरटीजीएसद्वारे तक्रारदार आहिरे यांच्या कल्याणीनगर शाखा या खात्यातून एकूण 59 लाख रुपये आरोपींना दिले. मात्र, आरोपींनी तक्रार यांचे कोणतेही काम न करता तसेच त्यांचे पैसे परत न करता त्यांचे आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस करत आहे.