आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:मैत्रिणीच्या नावावर कर्ज काढून मैत्रिणींनीच केली 69 लाखांची फसवणूक, 6 जणांवर गुन्हा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक अडचण असलेल्या मैत्रिणींनी व्यवसायासाठी कर्ज काढून दे त्याचे हप्ते आम्ही भरू असे सांगत 69 लाख 29 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सहा आरोपींवर बिबेवाडी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली आहे.

मानसी पार्थ जोशी (वय -39 ,राहणार- बिबेवाडी, पुणे )यांनी याबाबत आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार कल्याणी शशिकांत लोणकर( वय -34 ),शशिकांत वसंत लोणकर (वय -५६), समिधा शशिकांत लोणकर ,ऋतिका लोणकर, सुशील लोणकर, उत्तम शेळके (सर्व राहणार - बिबेवाडी, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

नक्की काय झाले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी लोणकर ही तक्रारदार मानसी जोशी यांची जवळची मैत्रीण आहे. लोणकर हिने वैवाहिक जीवन संपुष्टात येत असून अडचणीत असल्याचे सांगितले.त्यासाठी तिने ५० ते ६० लाख रुपयांची गरज असून आर्थिक मदत करण्याचे सांगितले. तू वैयक्तिक कर्ज काढ, त्याचे हप्ते मी नियमित भरेन असे आश्वासन देत हप्त्यांव्यतिरिक्त चांगला परतावा देण्याचेही खात्रीशीर सांगितले.

त्यानंतर मानसी जोशी यांचा विश्वास संपादन करून, कल्याणी लोणकर हिने उत्तम शेळके यांच्याशी संगणमत करून जोशी यांना विविध बँकेचे 80 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून दिले. त्यानंतर कल्याणी लोणकर हिने स्वतःच्या अडचणी करीता त्यापैकी 48 लाख 14 हजार रुपये परत देऊन उर्वरित रक्कम तसेच कर्जावरील बँकेचे हप्ते, दंड नं भरता तक्रारदार यांची 69 लाख 29 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

तक्रारदार यांनी हे पैसे मागण्यासाठी गेल्या असता, आरोपींनी त्यांना धमकी देऊन शिवीगाळ केली आहे. याप्रकरणी जोशी यांनी न्यायालयाकडे दाद मागितली असता, न्यायालयाने सीआरपीसी 156/ 3 प्रमाणे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत बिबेवाडी पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक गुन्हे एस हिवरकर पुढील तपास करत आहेत.