आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरेदीच्या बहाण्याने आली 2. 83 लाखांचे ब्रेसलेट घेवून गेली!:विमाननगर येथील एका शाॅपमधील प्रकार; घटना सीसीटीव्हीत कैद

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉलमध्ये खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरलेल्या एका उच्चभ्रू दिसणाऱ्या महिलेने शोरुममधून दोन लाख ८३ हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट चोरुन नेले आहे. याप्रकरणी राहुल चौरसिया (वय- ३०, रा. गणेशनगर, बोपखेल,पुणे) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. ही घटना पाच मार्चला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास विमाननगरमधील ब्ल्यू स्टोन शॉपमध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार राहूल चौरसिया हे विमाननगरमधील ब्ल्यू स्टोन शोरुममध्ये कामाला आहेत. पाच मार्चला संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास खरेदीच्या बहाण्याने एक महिला दुकानात आली. तिने दुकानातील कामगारांचे लक्ष विचलित करुन शोरुममधील दोन लाख ८३ हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट परस्पर चोरुन नेले.

महिला शोरुममधून बाहेर निघून गेल्यानंतर कामगारांना सोन्याची चोरी झाल्याचे सीसीटिव्हीमध्ये दिसून आले. त्यानंतर राहूल चौरसिया यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप करपे पुढील तपास करीत आहेत.

मेट्रोचे साहित्य चोरीला

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामातून चोरट्यांनी २० हजारांचे साहित्य चोरुन नेले.याप्रकरणी संजय मुलगे (वय- ३८, रा. हडपसर,पुणे) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

सदर घटना पाच मार्चला पहाटेच्या सुमारास बाणेर रस्ता परिसरात घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महामेट्रोचे काम करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात मेट्रोच्या वतीने लोखंडी साहित्य ठेवण्यात आले होते. दरम्यान, ५ मार्चला चोरट्यांनी २० हजार रुपयांचे ३०० किलो साहित्य गुपचूप चोरुन नेले. याप्रकरणी रिक्षातून साहित्य चोरी करणार्‍या चोरट्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...