आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतापाच्या भरात केला कहर:पत्नीने घटस्फोट दिल्याच्या रागातून पतीने पेटवल्या पार्किंगमधील गाड्या, पुण्यातील घटना, आरोपी ताब्यात

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीने घटस्फोट दिल्याच्या रागातून पुण्यातील एका व्यक्तीने रागाच्या भरात पार्किंगमधल्या गाड्या पेटवल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. पुण्यातील कोंढवा भागातून हा प्रकार समोर आला आहे. चार दुचाकी, एक चारचाकी आणि एका रिक्षाला या व्यक्तीने आग लावली. यात काही गाडया जळून खाक झाल्या. काही गाडयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गाडया पेटवल्यामुळे अनेकांकडून संताप व्यक्त होत आहे.

नेमके प्रकरण काय?

टेरेन्स डॉमिनिक जॉन असे या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी पहाटे 5 वाजता ही घटना घडली. आरोपी टेरेन्स आणि त्याची पत्नी यांचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपी कोणताही काम धंदा करत नसल्याने पत्नीने त्याच्याविरोधात घटस्फोटात अर्ज दिला. आरोपीने घटस्फोट देऊ नको असे सांगितले तरीही त्याच्या पत्नीने अर्ज दाखल केला. घटस्फोटाच्या अर्जावरून चिडलेल्या जॉनने पत्नीचे दुचाकी जाळायचे ठरवले.

संतापाच्या भरात पत्नीच्या दुचाकीसह पार्किंगमधल्या असलेल्या इतर दुचाकींसह परिसरातील चारचाकी, रिक्षा आणि वाहनांवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्या.

रागाच्या भरात पेटवली वाहने

पत्नीने घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दिली त्यामुळे टेरेन्सचा राग अनावर झाला. त्याने आपल्याच पत्नीची गाडी पेटवण्याचे रवलं आणि गाडी पेटवली. त्यानंतर पुन्हा राग आल्याने त्याने पार्किंगमधील इतरांच्या गाड्याही पेटवल्या. यामुळे सोसायटीतील अनेकांच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय त्यात एका रिक्षाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर नागरिकांनी त्यांच्यावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...