आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे क्राईम:पैशासाठी पत्नीला वेश्या व्यवसाय करण्यास लावणाऱ्या पतीसह दोन मित्रांवर गुन्हा दाखल, पीडितेला जातीवाचक शिवीगाळ

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैशाची गरज भागवण्यासाठी स्वतःच्या पत्नीस मारहाण करून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्या प्रकरणी पतीसह त्याच्या दोन मित्रांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 25 वर्षीय विवाहित महिलेने पोलिसांकडे पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती मंगळवारी देण्यात आली आहे.

महिलेच्या 31 वर्षीय पतीसह त्याचे मित्र आदित्य गौतम (रा.कसबा पेठ, पुणे) आणि सुजित पुजारी (रा.आंबेगाव ,पुणे )यांच्यावर याप्रकरणी बलात्कार, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 4-5 आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

वेश्या व्यवसायास भाग पाडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पीडित महिला आणि आरोपी हे पती-पत्नी आहेत. पतीने पैशाची गरज भागवण्यासाठी पिडीतेला मारहाण करून उंड्री ,हांडेवाडी रस्त्यावर उभे करून वेश्याव्यवसाय करण्यास मागील दोन वर्षापासून जबरदस्तीने भाग पाडले. त्याचे मित्र आदित्य गौतम आणि सुजित पुजारी यांच्याकडून त्याने प्रत्येकी तीन हजार रुपये घेऊन महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध करण्यास भाग पाडले.

संबंधित आरोपींनी महिलेशी अनैसर्गिक संबंध ठेवून नंतर महिलेची गाडी आडवून तिला जातीवाचक शिवीगाळ केली. तिच्यावर राजनौतिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.

प्रकरण हडपसर पोलिसांकडे

याप्रकरणी पीडित महिलेने समर्थ पोलिस ठाण्यात सुरुवातीला तक्रार दाखल केली होती. संबंधित गुन्हा हडपसर पोलिस ठाण्याकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत हडपसर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई पुढील तपास करत आहेत.