आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:बेकायदेशीररित्या सावकारी करणाऱ्या तीन आरोपींवर गुन्हा दाखल, दोघांना अटक, वारजे भागातील घटना

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील वारजे परिसरात बेकायदेशीररित्या सावकारी करणाऱ्या तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिकाने घेतलेल्या कर्जाची अधिकच्या पैशांची परतफेड केल्यानंतरही खासगी सावकाराने त्यास पैशांची मागणी केल्याने दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अक्षय अंकुश शिरोळे, अंकुश शिरोळे (रा. धायरी, पुणे ) आणि सुरेश थोपटे (रा.शिवणे, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यापैकी अक्षय शिरोळे आणि सुरेश थोपटे या दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे. आरोपींविरोधात किशोर देवराज पवळे यांनी वारजे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सप्टेंबर 2022 पासून आतापर्यंत गुन्हा घडला आहे.

अधिक पैशांची मागणी

वारजे परिसरात दांगट पाटीलनगर याठिकाणी पावडर कोटींगचा व्यवसाय करत असलेल्या एका व्यवसायिकानी कामासाठी तीन खाजगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. मात्र, त्याबदल्यात अधिकच्या पैशांची परतफेड करूनही व्यवसाईकाकडे आणखी पैशांची मागणी केली जात होती.

बेकायदेशीर सावकारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,अक्षय अंकुश शिरोळे व त्याचे वडील अंकुश शिरोळे हे बेकायदेशीररित्या सावकारकीचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांना अक्षय शिरोळे यांनी साडेचार लाख रुपये उधारीवर दिले होते.

त्याबदल्यात सात लाख सहा हजारांची परतफेड करण्यात आली होती. तर ,अंकुश शिरोळे यांनी दीड लाख रुपये उधारीवर दिले होते. त्याबदल्यात दोन लाख 60 हजार रुपयांची परतफेड करण्यात आली होती. तर सुरेश थोपटे याने तीन लाख रुपये उधारीवर दिले होते आणि त्या बदल्यात तीन लाख 90 हजार रुपयांची परतफेड तक्रारदार यांनी केलेली होती.

पुढील तपास सुरू

संबंधित सावकार अधिक पैसे खंडणी रूपाने, जबरदस्तीने ,अपहरण करून, पिस्तूलचा धाक दाखवून, जिवे ठार मारण्याची धमकी देऊन ,संगनमताने पैसे उकळत होते. त्यामुळे याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक एस बाबर याबाबत पुढील तपास करत आहे.