आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातउसने दिले 10 लाख, उकळले 20 लाख!:व्याजाची उर्वरित रक्कम न दिल्यास हातपाय कापून टाकण्याची तरुणाला धमकी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

व्याजापोटी उसने घेतलेल्या 10 लाखांचे बदल्यात 21 लाख रूपये माघारी देउनही आणखी 20 लाख रूपये खासगी सावकाराने मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. असे असताना साथीदारांच्या मदतीने संबंधिताचे अपहरण करून खिशातील 82 हजारांची रोकड काढून घेत उर्वरित व्याजाची रक्कम न दिल्यास हातपाय कापून टाकण्याची धमकी टोळक्याने दिली आहे. ही घटना 5 जानेवारीला रात्री बाराच्या सुमारास येरवड्यातील गुंजन चौकात घडली. अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

अतुल उर्फ पप्पु कुडले( रा. दत्तवाडी,पुणे), बांदल, बालाजी उर्फ भैय्या कदम यांच्याविरूद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.संतोष विष्णू तिंबोळे (रा. जुनी सांगवी,पुणे) यांनी तक्रार दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर येरवडा कारागृहात असताना फिर्यादी संतोष आणि आरोपी अतुलची ओळख झाली होती. त्यानंतर संतोषने अतुलकडून 10 लाख रूपये व्याजाने घेतले होते. त्यानंतर संतोषने त्याला 10 लाखांच्या बदल्यात 21 लाख रूपये माघारी दिले होते. मात्र, आरोपी अतुलने संतोषला पुन्हा 20 लाख रूपये देण्याचा तगादा लावला. पैसे न दिल्यामुळे इतर साथीदारांच्या मदतीने त्यांनी संतोषचे अपहरण केले. त्याच्या खिशातील 82 हजार रूपये जबरदस्तीने काढून घेतले. मारहाणही करण्यात आली. तु जर मला व्याजाचे पैसे दिले नाही तर, आम्ही तुझा हात कापून टाकू अशी धमकी आरोपींनी दिली. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटींची पाहणी करत आरोपींचा माप काढणे सुरू केले आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एन. गुरव पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...