आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे शहरात मागील काही दिवसातंपासून काेयता गँगचे प्रस्थ वाढताना दिसत असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हडपसर परिसरातील मांजरी रेल्वे स्टेशन जवळ एका घरात पाच अज्ञात चाेरटयांनी थेट घरात शिरुन कुटुंबातील व्यक्तींना काेयत्याचा धाक दाखवून माेबाईल फाेन व राेख रक्कम असा 14 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जबरीने पळवून नेल्याची माहिती पाेलिसांनी बुधवारी दिली.
याप्रकरणी हडपसर पाेलिस ठाण्यात पाच अनाेळखी इसम विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अमर माैला तांबाेळी (वय 41) यांनी पाेलीसांकडे आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. तांबाेळी यांचे मित्र गाेकुळ वर्मा हे मांजरी परिसरात राहत असून त्यांचे घरी जेवणासाठी ते 25 डिसेंबर राेजी रात्री गेले हाेते. त्यावेळी अनाेळखी पाच व्यक्तींनी त्यांचे मित्राचा घराचा दरवाजा जाेरात ढकलुन घरात शिरुन त्यातील एका इसमाने काेयताज उगारुन पाठीवर उजव्या दंडाजवळ काेयता मारुन तसेच गाेकुळ वर्मा यांचे गळयाला चाकू लावून शिवीगाळ करत, आवाज करु नका नाहीतर खल्लास करीन अशी धमकी देऊन त्यांचा व त्यांच्या मित्राचा माेबाईल फाेन व राेख रक्कम असा 14 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने नेण्यात आला.
तक्रारदार हे घाबरलेले असल्याने त्यांनी याबाबत उशीराने तक्रार दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी दिली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्याक पाेलिस निरीक्षक एस जाधव करत आहे.
तरुणास चाकू मारुन लुटमारी
येरवडा परिसरातील गुंजन चाैकातील बस स्टाॅप जवळ 1 जानेवारी राेजी रात्री पावणेबारा वाजता कृष्णा रघुनाथ इंगळे (वय 24,रा.लिंक राेड,पुणे) हा तरुण त्याच्या मित्रासह जात हाेता. त्यावेळी सदर ठिकाणी काही मुले गाेंधळ करीत असल्याने कृष्णा व त्याचा मित्र त्याठिकाणी काय गाेंधळ सुरु पाहण्यासाठी थांबले.
त्यावेळी एका अनाेळखी इसमाने त्याच्याकडे पैसे मागुन त्याचे खिसे तपासले तेव्हा त्यास पैसे न मिळाल्याने, सदर गाेष्टीचा राग मनात धरुन त्याने कृष्णास शिवीगाळ करुन दुसऱ्या अनाेळखी ईसमाने तक्रारदार याच्या पाेटाच्या डाव्या बाजूस चाकू खुपसून त्याचे पैसे लुटण्याचा प्रयत्न करुन त्यास गंभीर दुखापत केली आहे. या घटनेनंतर तरुणाने ससून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर येरवडा पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.