आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक!:प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणास आत्महत्येस भाग पाडले; पुण्यात तरुणीला ठोकल्या बेड्या

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवाह झालेल्या एका तरुणास प्रेमाच्या जाळयात ओढून पती-पत्नीत दुरावा निर्माण करुन तरुणी म्हणेल त्याप्रमाणे वागण्याची सक्ती केल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली हाेती. याप्रकरणी आराेपी तरुणीस येरवडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती शुक्रवारी दिली. हरीष प्रेमकिशन पवार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

याबाबत हरीष पवार याच्या 48 वर्षीय आईने आराेपी तरुणी विराेधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 2021 ते 12 ऑगस्ट 2022 दरम्यान घटला. हरीष पवार याचे लग्न झाले असतानाही आराेपी तरुणीने त्याला प्रेमाच्या जाळयात ओढले. त्यानंतर त्याच्या पत्नीला फाेन करुन दाेघांमध्ये दुरावा निर्माण केला. तरुण काम करत असलेल्या कामाचे ठिकाणी जावुन त्याला तरुणीने तिचे साेबत येण्याची व ती म्हणेल तसे वागण्याची सक्ती करुन त्याचा मानसिक छळ केल्याने दाेघात वाद झाला. 12 ऑगस्टला तरुणीने हरीषला ‘तु मर मला तुझे मेलेले ताेंड बघायचे आहे’ असे दडपण टाकुन त्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याने हरीषने आगाखान ब्रिज वरून नदीत उडी मारून आत्महत्या केली.

संबंधित या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात अक्समात मयतचा गुन्हा नाेंद करण्यात आला हाेता. पोलिसांनी या गुन्हयाचा तपास केल्यानंतर दाेषी तरुणीवर गुन्हा दाखल करुन तिला अटक केल्याची माहिती दिली आहे. याबाबत पुढील तपास येरवडा पोलिस करत आहे.

दिराकडून वहिनीची विनयभंग

नात्यातील एका वहिनीचा दीराने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मनाेज संभाजी माेरे (वय-40,रा.नाशिक) याचे विराेधात हडपसर पोलिस ठाण्यात पिडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. माेरे याने पीडितेला ‘तु मला आवडेत, तुझ्या नवऱ्याला मारुन टाक व माझ्याकडे निघून ये. नाहीतर मी तुझी गावात बदनामी करीन’ असे म्हणून तिचे मनाला लज्जा उत्पन्न हाेईल असे वर्तन करुन तुला साेडणार नाही अशी धमकी दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आाला आहे.

बातम्या आणखी आहेत...