आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातगाडी चालकावर कोयत्याने वार:हल्लेखोराला पोलिसांकडून अटक; सुरक्षारक्षकाची विसरलेली वाॅकीटाॅकी घेण्यासाठी केला होता हल्ला

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विमानतळ परिसरात एका साेसायटीत सुरक्षारक्षक म्हणून काम करणारी व्यक्ती त्याची वाॅकीटाॅकी एका हातगाडीवर विसरला हाेता. त्यानंतर ती वाॅकीटाॅकी घेण्यास येण्यापूर्वीच हातगाडी चालकावर धारदार लाेखंडी काेयत्याने वार करुन त्यास जखमी करणाऱ्या पसार झालेल्या आराेपीस विमानतळ पाेलीसांनी जेरबंद केले आहे.

फिराेज शेख (रा.लाेहगाव,पुणे) असे अटक केलेल्या आराेपीचे नाव आहे. याबाबत त्याच्या विराेधात आनंद महेश नडगम यांनी विमानतळ पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आनंद नडगम हे २५/९/२०२२ राेजी काम करत हाेते. त्यावेळी एक साेसायटीचा सुरक्षारक्षक त्यांचे हातगाडीवर वाॅकीटाॅकी विसरुन गेला हाेता. त्यानंतर विसरलेली वाॅकीटाॅकी आराेपी फिराेज शेख व त्याचे तीन साथीदारांनी जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिराज शेख व त्याच्या साथीदारांनी त्यास शिवीगाळ करुन, तुला आज जिवंत साेडणार नाही, असे म्हणून खाली पाडुन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

फिराेज शेख याने त्याच्याकडील काेयत्याने नडगम यांच्यावर वार करुन त्यांना गंभीर जखमी करत पुढील दाेन दात अर्धवट ताेडले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आराेपी फिराेज शेख पसार हाेऊन पाेलीसांना गुंगारा देत हाेता.

संशयित आराेपीबाबत पाेलीस तपास करत असताना, पाेलीस शिपाई नाना कर्चे व याेगेश थाेपटे यांना संबंधित आराेपी त्याचे राहते घरी आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पाेलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे यांच्या पथकाने माहितीची शाहनिशा करुन कारवाई करत आराेपीस जेरबंद केले. याबाबत विमानतळ पाेलीस पुढील तपास करत आहे.

ही कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पाेलीस आयुक्त रामनाथ पाेकळे, परिमंडळ चारचे पाेलीस उपायुक्त शशिकांत बाेराटे, सहाय्यक पाेलीस आयुक्त किशाेर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पाेलीस निरीक्षक विलास साेंडे, पाेलीस निरीक्षक संगीता माळी, पाेलीस उपनिरीक्षक रविंद्र ढवरे, पाेलीस अंमलदार अविनाश शेवाळे, सचिन कदम, सचिन जाधव, रुपेश पिसाळ, गिरीष नाणेकर, नाना कर्चे, याेगेश थाेपटे यांचे पथकाने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...