आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे क्राईम:कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक यांच्यासह 20 ते 25 जणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक मधुकांत गरड यांच्यासह 20 ते 25 जणांच्या विरुद्ध जातीवाचक शिवीगाळ , विनयभंग आणि अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 45 वर्षीय लिंबू विक्रेत्या महिलेने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लिंबू विक्रेत्यांच्या विरुद्ध कारवाई

या तक्रारीनुसार मधुकांत गरड, फळबाजार विभागाचे प्रमुख दत्तात्रय कळमकर, संभाजी काजळे, अमोल घुले यांच्यासह 20 ते 25 जणांच्या विरुद्ध जातीवाचक शिवीगाळ तसेच विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीने छत्रपती शिवाजी मार्केट यार्डच्या आवारातील बेकायदा फळ विक्रेते तसेच लिंबू विक्रेत्यांच्या विरुद्ध कारवाई केली होती.

जातीवाचक शिवीगाळ

फळबाजारात बेकायदा व्यवसाय करणाऱ्या लिंबू विक्रेत्यांनी कारवाईच्या निषेधार्थ मार्केट यार्डच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले होते.संबंधित कारवाई करताना, बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्यासह 20 ते 25 जणांनी जातीवाचक शिवीगाळ केली होती. त्याचप्रमाणे अश्लील शिवीगाळ केल्याची तक्रार लिंबू विक्रेत्या महिलेने दिली आहे. वानवडी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे याबाबत पुढील तपास करत आहेत.

वाहतुकीचा प्रश्न सुटला

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती तत्कालीन प्रशासक मधुकांत गरड म्हणाले, पुण्यातील मार्केटयार्डच्या आवारामध्ये बेकायदा व्यवसाय करणारे फळ विक्रेते, लिंबू विक्रेत्यांच्या विरुद्ध कारवाई केली होती. बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांमुळे बाजार आवारात वाहतूक कोंडी होत होती. कारवाईनंतर बाजार आवारातील वाहतुकीचा प्रश्न सुटला होता. ज्या महिलेने जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे. त्या महिलेला आम्ही ओळखत देखील नाही.