आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहडपसर येथील एका जमिनीवर सुरू असलेल्या बहुमजली इमारतीच्या भागीदारी प्रकल्पात अटी व शर्तीचा भंग करून प्रकल्पात सहभागी भागीदाराची फसवणूक केल्याने मार्वल सिग्मा होम्सचे बांधकाम व्यवसायिक विश्वजीत सुभाष झंवर (रा. मार्वल रेसिडेन्सी, साऊथ मेन रोड, कोरेगाव पार्क,पुणे) यांच्यासह विस्तारा आयटसीएलये डीबेंचार्स ट्रस्टी आणि इतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत निखील प्रमोद मगर (वय -37, मगरपट्टासिटी,पुणे) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
भागिदारीचा करारनामा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील दोन जागा मालक प्रमोद मगर आणि संजय देसाई यांच्या असलेल्या सहा एकर जागा डेव्हलपमेंटसाठी देण्याचे ठरल्यानंतर यासाठी मार्वल सिग्मा होम्सचे संचालक विश्वजीत झंवर यांनी समती दिली होती. त्यानुसार 29 नोव्हेंबर 2011 रोजी करार झाला. करारातील अटीतील मालकांचा हिस्सा 43 टक्के तर झंवर यांचा हिस्सा 57 टक्के ठरला. यावेळी 13 व्या अटीमध्ये जमीन मालक किंवा बांधकाम व्यावसाायिक हे कुठल्याही तिर्हाईत व्यक्ती किंवा संस्था याच्याबरोबर कुठलाही करारनामा करणार नाहीत. ज्यामुळे तिर्हाईत व्यक्ती तसेच सदरचा प्रकल्प पुर्ण करण्याकरीता संपूर्ण आर्थिक निधी मार्वल सिग्मा होम्सचा असेल असे स्पष्ट करण्यात आले होते.
68 कोटी 39 लाखांची फसवणूक
तसेच 36 महिन्यात प्रकल्प पुर्ण करण्याचे ठरले. तसेच तिघा भागिदारांच्या नावाने मार्वल-मगर- देसाई प्रोजेकट नावाने अॅक्सीस बँकेत खाते उघडले. 22 मजली मजली इमारतीत 68 सदनिका बांधण्यास मंजुरी मिळाली. त्यासाठी 16 फ्लॅट धरकांकडून बुकिंगची पैसे घेऊन त्यांना ताबा न देता, 11 कोटी 39 लाखांचा अपहार केला.
पुढे या प्रकल्पात दिरंगाई होऊन अद्याप काम पूर्ण झाले नाही. त्यानंतर पुरवणी करारपत्र 2015 मध्ये करण्यात आले. त्यामध्ये मालक 46 टक्के वाटा तर बांधकाम व्यावसायीक 54 टक्के वाटा असा करार झाला.
फसवणूकीचा गुन्हा
वाढ दिलेल्या 36 महिन्यानंतर प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास मालकांचा हिस्सा एक टक्क्याने वाढेल असा पुरवणी करारनामा झाल्याचे तक्रारीत सांगण्यात आले. दरम्यान हा प्रकल्प जेव्हा रेरामध्ये रजिस्टर करण्याची वेळ आली तेव्हा झंवर यांनी बांधकामावरती 55 कोटी रूपयांचे एका फायनान्सीयल कंपनीकडून कर्ज घेतल्याचे स्पष्ट झाले.
तसेच त्याचा वापर प्रोजेक्टसाठी न करता, या प्रकल्पाच्या अनुषंगाने अटी व शर्तींचा भंग झाल्यानंतर तब्बल 68 कोटी 39 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.