आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील धक्कादायक प्रकार:14 वर्षाच्या मुलावर चाकूचा धाक दाखवत तरुणाकडून लैंगिक अत्याचार

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका 20 वर्षीय तरुणाने 14 वर्षाच्या मुलास चाकुने मारण्याचा धाक दाखवुन त्याला दुचाकीवर बसवून अपहरण करुन नेले. त्यानंतर त्याला निर्जन ठिकाणी नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला. याप्रकरणी काेंढवा पाेलिसांनी एका आराेपीस अटक केल्याची माहिती बुधवारी दिली.

मेहंदी जाफर इराणी (वय 20,रा. पिसाेळी,पुणे) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. याबाबत पिडित 14 वर्षीय मुलाने काेंढवा पाेलीस ठाण्यात आराेपी विराेधात फिर्याद दाखल केली आहे. सदरचा प्रकार 2 जानेवारी राेजी सायंकाळी सात वाजता घडला. घटनेच्या दिवशी पिडित मुलगा हा त्याच्या भावाच्या घरी पायी चालत जात हाेता. त्यावेळी त्याच्या पाठीमागुन माेटारसायकलवर मेंदी इराणी हा आराेपी जवळ आला.

त्याने चाकूचा धाक दाखवून मुलाच्या इच्छेविरुध्द त्याला त्याच्या गाडीवर बसवुन लुल्लानगर येथील केंद्रीय विद्यालयाजवळील जंगलात निर्जन ठिकाणी नेले. त्याठिकाणी मुलास विवस्त्र करुन त्याने त्याच्याशी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पिडित मुलाने घरी गेल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत पालकांना सदर प्रकार सांगितल्यानंतर पाेलिसांकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली.

पाेलीसांनी आराेपीचा तात्काळ शाेध घेत त्यास जेरबंद केले आहे. याप्रकरणी सहाय्यक पाेलिस निरीक्षक एस. शिळीमकर पुढील तपास करत आहे.

महिलेचे मंगळसुत्र चाेरटयांनी पळवले

प्रचंड रहादारीच्या सिंहगड रस्त्यावर गिरीजा हाॅटेल शेजारील बस स्टाॅपजवळ 3 जानेवारी राेजी सायंकाळी दिपाली धनंजय माळवे (वय 34, रा.खडकावासला, पुणे) या पतीची वाट पाहत थांबल्या हाेत्या. त्यावेळी नांदेडसिटीकडून धायरीकडे येणाऱ्या माेटारसायकलवरील दाेन अनाेळखी इसमांपैकी गाडीवर मागे बसलेल्या चाेरटयाने त्यांचे गळयातील साेन्याचे 12 ग्रॅम वजनाचे 40 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसाकवुन ओढून चाेरुन नेले. तर, दुसऱ्या घटनेत सुरेखा मनाेज शिवरकर (वय 55, रा.रास्ता पेठ, पुणे) या तीन जानेवारी राेजी शाहू उद्यान समाेरुन पायी घरी जात असताना, माेटारसायकलवरुन आलेल्या दाेन इसमांनी त्यांच्या गळयातील 50 हजार रुपये किंमतीचे दाेन ताेळे वजनाचे मंगळसुत्र हिसका मारुन जबरदस्तीने चाेरुन नेले. याबाबत समर्थ पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बातम्या आणखी आहेत...