आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात वैद्यकीय मदतीच्या बहाण्याने ऑनलाइन फसवणूक:2 लाखांचा गंडा घालणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर हडपसर ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत राहत असलेल्या एका नातेवाईकांना तातडीची वैद्यकीय मदत पाहिजे, असे सांगून परदेशाील क्रमांकावरुन फाेन करुन ऑनलाइन स्वरुपात दाेन लाख रुपये तात्काळ मागून घेत एका नागरिकाची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनाेळखी माेबाईल धारकावर हडपसर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी बुधवारी दिलेली आहे.

परमंदिरसिंग सरदार दर्शनसिंग दुरेजा (वय-53,रा.पुणे) यांनी याबाबत पाेलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. सदरचा प्रकार 18 फेब्रुवारी राेजी घडलेला आहे. तक्रारदार यांचे दाजी जतिंदर बेदी हे अमेरिकेत कामानिमित्त कुटुंबा समवेत रहाण्यास आहे. त्यांच्याशी दुरेजा यांचे चांगल्याप्रकारे जिव्हाळयाचे संबंध आहे. याचा गैरफायदा घेत अनाेळखी आराेपीने त्यांचे दाजी जतिंदर बेदी यांचा फाेटाे व्हाॅटसअप डीपीला ठेवून परदेशातील एका क्रमांकावरुन तक्रारदार यांचे व्हाॅटसअप क्रमांकावर मेडिकल इर्मजन्सी असल्याचे भासवले.

त्यानुसार सुरुवातीला तक्रारदार यांचेकडून पैशाची मागणी करत 99 हजार रुपये ऑनलाइन घेण्यात आले. त्यानंतर आणखी पैशांची रुग्णालयात गरज असल्याचे सांगत एक लाख रुपये आणखी मागवून घेण्यात आले. वैद्यकीय गरज असल्याने दुरेजा यांनीही काेणतीही खातरजमा न करता पैसे पाठवून दिले.

परंतु पैसे पाठविल्यानंतर त्यांना काेणता रिप्लाय न आल्याने संशय आल्यामुळे त्यांनी परदेशातील दाजींना फाेन करुन पैसे मिळाले आहे का? अशी विचारणा केली. त्यावेळी सदरचा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. तक्रारदार यांनी बँकेत याबाबत तक्रार दाखल केल्यावर पैसे आधीच हस्तांतरित झाले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अखेर त्यांनी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. याबाबत पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक एस गाेसावी पुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...