आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्यावसायिकाला बांधकाम प्रकल्प करु असे सांगत वेळोवेळी पैसे घेण्यात आले. मात्र, त्यानंतर त्याच्याकडून वेळोवेळी पैसे घेत भागीदारी संपल्यानंतर मिळणारी 2 कोटी 4 लाख 56 हजार रुपयांची रक्कम न देता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच आरोपींवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.
नरसिंगभाई अर्जुनभाई पटेल( वय- 54 ),दिनेश भाई पटेल (वय - 3८), रींकतबेन पटेल ,अशोक शिवाजी तुपे (वय- 55 ),राहुल अशोक तुपे( वय- 27 ,सर्व राहणार -हडपसर ,पुणे) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात सदर आरोपीं विरोधात सुभाष जयवंत कड (वय- 55 ,राहणार - उंड्री, पुणे )यांनी तक्रार दाखल केली आहे . ही घटना 23/ 9/ 2011 ते आतापर्यंत घडलेला आहे.
नक्की झाले काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींनी तक्रारदार सुभाष कड यांना पिसोळी येथील जगदंब भुवन रस्त्यावर सर्वे नंबर 15 याठिकाणी माउंट स्केप नावाने बांधकाम प्रकल्प सुरू करू असे सांगितले. त्यासाठी नयन बिल्डकॉन भागीदार फर्म चालू करून ठरल्याप्रमाणे प्रकल्पाच्या खर्चासाठी 20 टक्के रक्कम एकूण पावणेदोन कोटी रुपये फर्मसाठी खर्च करण्यात आली. तसेच आरोपी अशोक तुपे यांच्या मुलीच्या लग्नासाठी तक्रारदार सुभाष कड यांनी 29 लाख 55 हजार रुपये रोख दिले होते.
ही रक्कम तक्रारदार यांनी आरोपींकडे वेळोवेळी मागितले असता, त्यांना आरोपींनी वेळकाढू पणा करून प्रोजेक्ट संपल्यानंतरही, तक्रारदार यांना मिळणारी एकूण दोन कोटी चार लाख 56 हजार रुपयांची रक्कम न देता त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. सीआरपीसी 156 /3 प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक एस शिंदे पुढील तपास करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.