आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:पुणे पोलिसांना संशयित कार मध्ये मिळाले तीन कोटी 42 लाख रुपयांचे घबाड

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात संशयित कारमधून तीन कोटी 42 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून एकाच ताब्यात घेण्यात आले आहे.

नक्की काय घडले?

एक संशयित ब्रिजा कार एम एच 13 सी के 2111 ही ताब्यात घेतली. सदरचे वाहन व संशयित चालकास हडपसर पोलीस स्टेशनला आणून कारची झडती घेतली असता, सदर वाहनात मिळून आलेल्या बॅगा पोलिसांनी तपासल्या असता त्यात, त्यामध्ये एकूण 3 कोटी 42 लाख 66 हजार 220 रुपये मिळून आले आहे.

सदरची रोख रक्कम पोलिसांनी मोजून दोन पंच समक्ष जप्त करून सीलबंद केली आहे.याप्रकरणी प्रशांत धनपाल गांधी (वय- 47 वर्षे, रा. लासूरणे ता.इंदापूर जि.पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तसेच त्यांच्याकडील ताब्यातील वाहन जप्त करण्यात आले आहे.गांधी यांचा खत व्यवसाय,दूध व्यवसाय,किराणा दुकान व शेती व्यवसाय आहे.

कर्जाची परफेड करण्यासाठी..

याबाबत सी आर पी सी कलम 41(डी) अन्वये हडपसर पोलीस ठाणे येथे कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आयकर विभाग,पुणे यांना ही याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. याबाबत प्रशांत गांधी यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, सदरची रक्कम हे त्याच्या राहत्या घरातून पुणे येथील महाराष्ट्र बँक मुख्य शाखा,लक्ष्मीरोड येथे कर्जापोटी संबधित रक्कम भरायची होती असे सांगितले आहे.

याबाबत हडपसर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस संयुक्तपणे तपास करत आहेत अशी माहिती पुणे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.