आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांचा आदेश धुडकावून शहरात:तडीपार गुंडाला पोलिसांच्या बेड्या; पिस्तुलासह शस्त्रे केली जप्त

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरातून तडीपार केल्यांतर पिस्तुल घेऊन वावरणाऱ्या गुंडाला गुन्हे शाखेने सिंहगड रस्ता भागात पकडले. गुंडाकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि काडतुस जप्त करण्यात आली आहे.

अजय शंकर सुतार (वय 20 ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तसेच मुंढवा भागात तडीपार गुंडाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. सागर शंकर घोडके (वय 22) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

सुतार याला शहरातून तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीचा आदेश भंग करुन तो शहरात आला होता. सिंहगड रस्ता भागातील वडगाव उड्डाणपुलाजवळ तो थांबला होता. त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती गु्न्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विराेधी पथकाला मिळाली.

पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. पोलिस निरीक्षक उल्हास कदम, सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक शाहिद शेख, बाळू गायकवाड, गणेश ढगे, रवींद्र लोखंडे आदींनी ही कारवाई केली.

दरम्यान, मुंढवा भागात तडीपार केलेल्या गुंडाला पकडण्यात आले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. घोडकेला तडीपार करण्यात आले होते. तो मगरपट्टा सिटी भागात थांबला होता. पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडले, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे, सहाय्यक निरीक्षक संदीप जाेरे, दिनेश राणे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे यांनी ही कारवाई केली.

एसटी बसच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू

भरधाव एसटी बसच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर हडपसर भागात घडली. अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. संजय सुदाम साळवे (वय ४०, रा. रामटेकडी, हडपसर,पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

या प्रकरणी एसटी बसचालक चाँद सुलतान नसरुद्दीन शेख (वय 31, रा. कुंभारगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत दुचाकीस्वार प्रकाश अशोक घुसर (वय 19, रा. रामटेकडी, हडपसर,पुणे) याने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार घुसर आणि साळवे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सोलापूर रस्त्याने निघाले होते.

हडपसर भागातील रामटेकडी चौकात भरधाव एसटी बसने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी साळवे गंभीर जखमी झाले. दुचाकीस्वार घुसरला दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या साळवे यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलिस उपनिरीक्षक एस गावडे तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...