आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहडपसर परिसरातील एमपी पेट्राेल पंपाच्या बाजुला एक प्रवासी घरी जाण्यासाठी उबेर कार बुक करुन थांबला हाेता. त्यावेळी याठिकाणी एक रिक्षाचालकाने येऊन विचारणा केली परंतु यादरम्यान प्रवाशाने त्यास शिव्या दिल्याचा गैरसमज हाेऊन रिक्षाचालकाने प्रवाशास बेदम मारहाण केल्याने प्रवाशाच्या डाेळयाखालील पडदा फाटून ताे जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी एक अनाेळखी रिक्षा चालक विराेधात हडपसर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश शिवाजी रुपनुर (वय 41, रा.मांजरी,पुणे) यांनी पाेलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार 2 जानेवारी राेत्री रात्री पावणेदहा वाजता घडला आहे. गणेश रुपनुर हे घटनेच्या दिवशी त्यांची उबेर कार बुक करुन घरी जाण्यासाठी हडपसर परिसरात थांबले हाेते. त्यावेळी अनाेळखी रिक्षाचालक येऊन त्याने कुठे जायचे अशी विचारणा केली.
तु मला का शिव्या दिल्या?
त्यानंतर त्यास तक्रारदार यांनी शिव्या दिल्याचा गैरसमज हाेऊन, रिक्षाचालकाने ‘तु मला का शिव्या दिल्या’ असे विचारले असता, प्रवाशाने ‘मी तुला शिव्या दिल्या नाही’ असे स्पष्टपणे सांगितले. तेव्हा चिडुन जाऊन रिक्षरचालकाने वाईट शिवीगाळ करत प्रवाशाच्या उजव्या डाेळयास मारल्याने त्याच्या डाेळयास मार लागुन त्यांचे डाेळयाखालील पडदा फाटुन ते जखमी झाले.
यानंतर त्यांनी नाेबेल हाॅस्पीटल येथे दाखल हाेत उपचार सुरु केले असून हडपसर पाेलिसांनी आराेपी रिक्षाचालकाचा शाेध सुरु केला आहे.
अनाेळखी मुलांकडून तरुणास मारहाण
कल्याणीनगर परिसरात ब्लु ग्रास साेसायटी येथे 1 जानेवारी राेजी पावणेपाच वाजता विकास जयप्रकाश शहा (वय 26,रा.खराडी,पुणे) हा त्याचा मित्र नितीन कुमार दास याच्यासाेबत माेटारसायकलवरुन जात हाेता. त्यावेळी तीन अनाेळखी मुलांनी दुचाकी वरुन येऊन त्यांना थांबवुन, विनाकारण सदर दाेघांना हाताने मारहाण, शिवीगाळ करुन एका मुलाने विकास याचे उजवे डाेळयाचे वर त्याचे हातात असणाऱ्या लाेखंडी वस्तूने जखम करुन दुखापत केली.
तर दुसऱ्या मुलाने नितीश याचा पाच हजार रुपये किंमतीचा माेबाईल फाेन त्याच्या पॅंटच्या खिशातून हिसकावून घेत आराेपी दुचाकीवर पसार झाले. ससुन रुग्णालयात तक्रारदार दाखल हाेऊन त्याने उपचार घेतल्यानंतर पाेलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.