आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफुरसुंगी परिसरातील एका साेसायटीत राहणाऱ्या कुटुंबास साेसायटीच्या व्हाॅटसअप ग्रुप मधून काढून टाकल्याने, सदर व्यक्तीने साथीदारांसह साेसायटीच्या अध्यक्ष असलेल्या महिलेच्या पतीस बेदम मारहाण करुन जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाच जणांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.
प्रिती किरण हरपळे (वय-38) यांनी याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 28 डिसेंबरला रात्री दहा वाजण्याच्या सुमारस घडला आहे. त्यानुसार पोलिसांनी सुरेश किसन पाेकळे, सुयाेग भरत शिंदे, अनिल म्हसके, शिवराम पाटील, किसन पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे घटना?
फुरसुंगीत ओम हाईटस सहकारी गृहनिर्माण संस्था साेसायटी आहे. तक्रारदार प्रिती हरपळे या साेसायटीच्या अध्यक्ष आहे. तक्रारदार व आराेपी हे एकाच साेसायटीत रहाण्यास असून सुरेश पाेकळे यांनी हरपळे यांचे पती किरण हरपळे यांना व्हाटॅसअपवरुन ‘तुम्ही मला ओम हाईटस ऑपरेशन’ या ग्रुप मधून रिमुव्ह का केले आहे? असा मेसेज केला. परंतु त्यास हरपळे यांनी रिप्लाय दिला नाही. त्यामुळे पाेकळे यांनी हरपळे यांना फाेन करुन मला तुम्हाला भेटायचे आहे असे म्हणून हरपळे यांचे ऑफीस मध्ये भेटण्यास आले. त्याठिकाणी पाेकळे यांनी सांगितले की, ‘तुम्ही मला ग्रुप मधून काढून का टाकले’ असे विचारल्याने किरण हरपळे यांनी ‘ ग्रुप मध्ये काेणीही कसलेली मेसेज टाकत आहे, त्यामुळे आम्ही ग्रुपच बंद केला आहे’. असे सांगितले. त्यावर पाेकळे याने त्यांना शिवीगाळ करुन त्यांचे ताेंडावर ठाेसा मारुन इतर आराेपींनी सदर ठिकाणी हरपळे यांचे पतीला मारहाण करुन जखमी केले आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एन. शेळके पुढील तपास करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.