आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:एकतर्फी प्रेमातून तरुणाचा चाकूने स्वतःवर वार करत आत्महत्येचा प्रयत्न; 11 वर्षीय मुलीचा दुकानदाराकडून लैंगिक छळ

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्वेनगर भागात एकतर्फी प्रेमातून तरुणाने स्वत:च्या पोटावर धारदार चाकुने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. प्रसाद चंद्रकांत दांगट (वय -34, रा. वडगाव बुद्रुक,पुणे) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

आत्महत्येचा प्रयत्न तसेच तरुणीला धमकी दिल्या प्रकरणी दांगट याच्या विरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती मंगळवारी देण्यात आली आहे. याबाबत एका 32 वर्षीय तरुणीने वारजे पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे.

एकतर्फी प्रेमातून घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दांगट तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. तरुणीने त्याला नकार दिल्याने तो चिडला होता. तरुणीशी जवळीक साधण्याच्या उद्देशाने तरुणीचा मागील काही दिवसांपासून पाठलाग करुन तिला सातत्याने त्रास देत होता. त्याने दुचाकीस्वार तरुणीचा पाठलाग करुन तिला धमकावले ही होते.

'तु विवाह कसा करतेच, ते बघतो अशी धमकी त्याने दिली होती. त्याने चाकुने पोटावर वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक एस जवळगी पुढील तपास करत आहेत.

11 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

पाषाण परिसरात राहणाऱ्या एक 11 वर्षाची मुलगी चिकनच्या दुकानात चिकन आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी चिकन दुकानदाराने सदर मुलीस 200 रुपये देतो असे सांगून तिला चिकन सेंटरच्या दुकानात घेऊन गेला. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार त्याने केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या 30 वर्षीय आईने चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, आरोपी इर्शाद कमरुद्दिन अन्सारी (वय 45 ,रा. लवळे, पुणे) या आरोपीवर बलात्काराचा तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.