आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटेम्पो लावण्यास जागा न मिळाल्याने झालेल्या वादातून एका व्यक्तीला बेदम मारहाण करुन त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुणे - अहमदनगर रस्त्यावरील खराडी भागात घडली आहे. याप्रकरणी टेम्पोचालकास विमानतळ पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती शनिवारी दिली.
याप्रकरणी जैनुद्दीन मोहम्मद नदाफ (वय -48, रा. विकासनगर, कलवड वस्ती, लोहगाव,पुणे) असे खून झालेल्या इसमाने नाव आहे. याप्रकरणी टेम्पोचालक अमोल नारायण सूर्यवंशी (वय- 27, रा. रायसोनी काॅलेजसमोर, वाघोली,पुणे) याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याबाबत बशीर मोहम्मद नदाफ (वय -36) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
नक्की घडले काय?
बशीर नदाफ यांचा भाऊ जैनुद्दीन, पुतण्या सुलतान आणि मतीन बागवान अहमदनगर रस्त्यावरील खराडी जकात नाका चौकात रिक्षा लावून गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी टेम्पोचालक अमोल सूर्यवंशी तेथे आला. त्याला टेम्पो लावण्यास जागा न मिळाल्याने त्यांच्यात वाद झाला.
सूर्यवंशीने जैनुद्दीनच्या छातीत जोरात ठोसा मारला आणि त्याला मारहाण केली. त्यामुळे बेशुद्धावस्थेतील जैनुद्दीनला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक संगीता माळी याबाबत पुढील तपास करत आहेत.
दुचाकी चोरास सक्तमजूरी
एका दुचाकी चोरास शिवाजीनगर न्यायलयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सी. पी. शेळके यांनी आठ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.महेश उर्फ मायकल नवनाथ कांबळे( रा.पुणे) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
कांबळे याने चंदननगर भागातून एक दुचाकी चोरली होती. त्याच्या विरुद्ध चंदनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात सरकार पक्षाकडून सरकारी वकील ॲड. योगेश कदम यांनी बाजू मांडली. न्यायालयाने साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरुन कांबळेला आठ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.