आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात विवाहितेला प्रेमसंबंधासाठी धमकी:पतीवर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल

पुणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या एका 26 वर्षीय विवाहितेला लग्नानंतर प्रेम संबंध ठेव नाहीतर, तुझ्या पतीवर अ‍ॅसिड फेकून त्यास मारण्याची धमकी देऊन विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या आराेपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत स्वारगेट पोलिस ठाण्यात पिडितेने तक्रार दाखल केल्यानंतर, आराेपी अन्वर मकबुल पठाण (वय-32,रा.पुणे) याचेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विवाहित तरुणी व आराेपी यांचे लग्नापूर्वी एकमेकांशी प्रेमसंबंध हाेते. परंतु लग्नानंतर मार्च 2021 पासून तरुणीने आराेपीशी प्रेमसंबंध ताेडलेले हाेते. मात्र, आराेपी अन्वर पठाण हा तरुणीला प्रेमसंबंध पुढे ही चालूच ठेव असे म्हणून तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी करत हाेता. त्याचप्रमाणे विवाहितेच्या इच्छे विरुध्द तिचा पाठलाग करुन, आराेपीने तिला शरीर संबंध न ठेवल्यास विवाहिता व तिचा पतीवर अ‍ॅसिड टाकून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आराेपीने विवाहिता घरात एकटीच असताना, तिच्या घरात बळजबरीने शिरुन तिला वाईट शिवीगाळ करुन तिला हाताने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आराेपी विराेधात स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आराेपीवर गुन्हा दाखल केला असून याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस जगताप करत आहे.

वकील महिलेस शिवीगाळ करणाऱ्यावर गुन्हा दाखल

पती विराेधात पत्नीने वकीला मार्फेत तक्रार केल्याने तसेच पत्नीस वकीलाने तक्रार देण्यास सांगितल्याचे रागातून पत्नीच्या महिला वकीलास व पत्नीस फाेन करुन अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी देणाऱ्या आराेपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शशिकांत भिंगारदिवे असे गुन्हा दाखल झालेल्या आराेपीचे नाव आहे. याप्रकरणी 40 वर्षीय महिला वकीलाने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार नऊ मार्च राेजी घडला आहे.

बातम्या आणखी आहेत...