आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएमपीएलमध्ये चोरी करणार्‍या दोन महिलांना अटक:चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बस थांबवून दिले पोलिसांच्या स्वाधीन

पुणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोर्‍या करणार्‍या दोन आरोपी महिलांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित चोरट्या महिलांना कॅम्प जवळ बस प्रवासात एका तरुणीचा ऐवज चोरताना रंगेहात पकडण्यात आले. ही घटना एक मार्चला सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे अशी माहिती पोलिसांनी गुरवारी दिली आहे.

फिर्यादी तरुणी महिला कामानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक बस स्थानकातून प्रवास करीत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन दोन चोरट्या महिलांनी तिच्या पिशवीतून ७०० रुपयांची रोकड चोरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सदर प्रकार महिलेच्या लक्षात आल्यामुळे तिने आरडाओरड करीत लगेच बस थांबविली. त्याचवेळी परिसरातील दोन पोलीस अमलदारांनी चोरट्या महिलांना ताब्यात घेतले. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक शिल्पा लंबे पुढील तपास करीत आहेत.

आरोग्य विभागाचे मुुकादमाचा मोबाइल चोरीला

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात प्रभारी मुकादम म्हणून कार्यरत असलेल्या एकाचा मोबाइल चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना एक मार्चला सकाळी साडेनउच्या सुमारास लुल्लानगरमधील माउंट कारमेल शाळेजवळ घडली आहे.याप्रकरणी विनीत पटेलिया (वय ३८ रा. समतानगर, कोंढवा,पुणे) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे अशी माहिती पोलिसांनी गुरवारी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनीत पटेलिया हे आरोग्य खात्यात वानवडी- रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात प्रभारी मुकादम म्हणून काम करत आहेत. एक मार्चला लुल्लानगर परिसरात साफ सफाईचे काम त्यांनी कामगारांकडून करुन घेतले. त्यानंतर त्याच परिसरातील एका गाड्यावर नाश्ता करीत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या नकळत खिशातील २० हजारांचा मोबाइल चोरुन नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...