आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुकानासमोर रंगाचे फुगे उडवू नका असे म्हणल्याचा राग आल्यामुळे टोळक्याने व्यवसायिकाच्या कुटूंबातील चौघांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास दुकान जाळून टाकून फायरिंग करण्याची धमकीही आरोपींनी दिली आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.
रोहन गायकवाड, आदित्य सरोदे, शुभम शिंदे, साहिल उलाद्री, मल्लेश येड्रामे, अनिकेत गमरे (सर्व रा. येरवडा,पुणे ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. रितीक अगरवाल (वय २३) याने या घटनेची तक्रार दिली आहे.
फायरिंगची धमकी
येरवडा परिसरात तक्रारदार रितीक अगरवालचे गौरव जनरल स्टाअर आहे. सात मार्चला आरोपींनी त्यांच्या दुकानासमोर काही रंगाचे फुगे उडविले. त्यास विरोध केल्यामुळे टोळक्याने रितीक आणि गौरवला हाताने मारहाण केली.यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या आई-वडिलांनाही धक्काबुक्की केली. त्याशिवाय पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास दुकान जाळून टाकून फायरिंग करण्याची धमकी आरोपींनी दिली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एस गुरव पुढील तपास करीत आहेत.
जून्या वादातून बेदम मारहाण
पुण्यातील येरवाडा भागात जुन्या किरकोळ वादातून तरुणाला बेदम मारहाण झाली आहे. दोन वर्षांपुर्वी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनामध्ये धरुन टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण करुन गंभीररित्या जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना 7 मार्चला येरवड्यातील गांधीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली आहे.
वसंत नारायण गालफाडे, अमर भंडारे, फैजल शेख, अरबाज शेख अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपीची नावे आहेत. लंकेश बनसोडे असे जखमी तरुणाचे नाव आहे. सुनिता बनसोडे (वय- 35) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
टोळक्याची मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सुनिता यांचा मुलगा लंकेशची वसंतसोबत दोन वर्षांपुर्वी किरकोळ कारणावरून वादावादी झाली होती. त्याचा राग मनामध्ये धरुन आरोपी वसंतने साथीदारांना बोलावून घेतले. घराशेजारी बसलेल्या लंकेशसोबत किरकोळ कारणावरुन वाद घालून त्याला टोळक्याने बेदम मारहाण केली. त्यांच्या घरातील संसारपयोगी साहित्याची तोडफोड करुन सोन्याचे गंठण आणि 30 हजार रुपयांची रोकड चोरुन नेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.