आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतापजनक:8 वर्षीय मुलावर 2 महिने अनैसर्गिक अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून घराशेजारी राहणाऱ्यांकडून सुरु होता प्रकार

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 8 वर्षीय मुलावर तीन जण सलग 2 महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची घटना घडली आहे. मुलाला अश्लील व्हिडीओ दाखवून घराशेजारी राहणाऱ्यांकडूनच हा प्रकार सुरु होता.

याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनंतर या तिन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. 8 वर्षीय मुलाला अश्लील व्हिडिओ दाखवून हे तरुण त्याच्यावर अत्याचार करत होते. हा प्रकार आम्ही तुझ्या घरी सांगू, अशी धमकी देत तरुण त्याच्यावर वारंवार अत्याचार करत होते.

बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा

संतोष उर्फ पक्या प्रकाश शिंदे (वय 21), हेमंत उर्फ हेम्या महेश माळवे (वय 19) आणि किरण सुरेश सावंत (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार या तिघांवर बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.

व्हिडिओ वापरुन ब्लॅकमेलिंग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पिडित मुलगा यांचे घर जवळ आहेत. आरोपीने मुलाला विमलची पुडी आणण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी मुलाला आपल्या घरी बोलावून तिघांनी त्याला अश्लील व्हिडिओ दाखवला. संतोष उर्फ पक्याने त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. आरोपी किरण सावंतने या घटनेचा व्हिडिओ तयार केला. आणि हाच व्हिडिओ वापरुन मुलाला ब्लॅकमेलिंग करण्यात आले.

चाकू खुपसून खून करेल

सलग 2 महिने या व्हिडिओचा वापर करुन आरोपींनी त्याच्यावर अत्याचार केले. यावेळी त्याला याबाबत कोणाला सांगितल्यास चाकू खुपसून तुझा खून करेल, पेटीत बंद करुन खड्डयात पुरेल. तुझ्या आईवडिलांनी कुठे गेला विचारले तर आम्हाला माहित नाही असे सांगेन, अशाप्रकारची धमकी देत आरोपींनी त्याच्यावर अत्याचार केले. मुलाने याबाबत घरच्यांना सांगितल्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.