आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे शहरातील विविध भागातून वाहने चाेरुन ती पुणे जिल्हयातील ग्रामीण भागात नेऊन अत्यल्प किंमतीत विक्री करुन पैसे मिळविणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यास सिंहगड राेड पोलिसांनी गजाआड केलेले आहे. राेहन महेंद्र देवरकर (वय-19,मु.रा.वडगाव निंबाळकर, ता.बारामती,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड राेड पोलिस स्टेशनच्या हद्दीत वाहनचाेरीच्या अनुषंगाने पोलिसांचे पथक पेट्राेलिंग करत हाेते. त्यावेळी पोलिस अंमलदार आबा उत्तेकर, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, यांना खबऱ्या मार्फेत माहिती मिळाली की, एक इसम वडगाव ब्रिजचे खाली धायरी फाटयाजवळ चाेरीची केसरी रंगाची यामाहा गाडी घेऊन थांबलेला आहे. त्यानुसार तपास पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम यांचे पथकाने घटनास्थळी जाऊन संशयित इसम थांबलेला दिसताच, त्यास ताब्यात घेऊन चाैकशी केली. त्याच्या जवळील माेटारसायकल गाडीचे कागदपत्रे व लायसन्स बाबत विचारणा केली असता, ताे काही न बाेलता इकडे तिकडे पाहून उडवाउडवीची उत्तीे देऊ लागला.
त्यामुळे पोलिसांनी त्याच्या ताब्यातील माेटारसायकलची माहिती काढली असता, ती वडगाव परिसरातील हॅप्पी काॅलनी येथून आराेपीने चाेरल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे सखाेल चाैकशी केली असता, सिंहगड राेड, वारजे माळवाडी, उत्तमनगर, लाेणीकाळभाेर, वडगाव आदी भागातून वाहनचाेरी केलेले आठ गुन्हे उघडकीस येत पोलिसांनी आठ माेटारसायकल आराेपीच्या ताब्यातून जप्त केल्या आहे.
सदरची कामगिरी परिमंडळ तीनचे पोलिस उपआयुक्त सुहेल शर्मा, सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर यांचे मार्गदशनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम, पोलिस उपनिरीक्षक गणेश माेकाशी, पोलिस अंमलदार आबा उत्तेकर, संजय शिंदे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, अमित बाेडरे, राजाभाऊ वेगरे, अमाेल पाटील, सागर शेडगे, देवा चव्हाण, स्वप्नील मगर, गणेश झगडे, अविनाश काेंडे, विकास बांदल, विकास पांडुळे यांचे पथकाने केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.