आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे क्राईम:सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीस अटक; दुसरीकडे पोटात लाथ मारल्याने गर्भपाताची घटना

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील फुरसुंगीत घडली आहे. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली असून इतर नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे.

पूजा प्रणव काळे (वय- 27रा. फुरसुंगी,पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.याप्रकरणी प्रणव रामदास काळे (वय 30 रा. मलकापूर, अमरावती) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. किशोर खेडकर (वय- 50 रा. नावेड अमरावती ) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात याबाबत आरोपी विरोधात तक्रार दिली आहे.

माहेरून पैसे आणण्याचा तगादा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पूजा आणि प्रणव यांचे काही वर्षांपुर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर पूजा सासरी नांदत असताना सासरच्या मंडळींकडून आणि पतीकडून तिचा सातत्याने छळ करण्यात आला.पूजाला माहेरहून तीन लाख रुपये आणण्यास तगादा लावला गेला. तिने पैसे आणण्यास नकार दिल्यामुळे सासरच्यांनी तिचा पुन्हा छळ केला. शारिरीक व मानसिक छळास कंटाळून पूजाने आठ एप्रिलला फुरसुंगीत गळफास घेउन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके याबाबत पुढील तपास करीत आहेत.

पोटात लाथ मारल्याने गर्भपात

पतीने गर्भवती पत्नीला बेदम मारहाण करुन तिच्या पोटावर लाथ मारल्याने गर्भपात झाला. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पतीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सुनील विनायक धारक (रा. शिंदवणे, लाेणी काळभोर,पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत 23 वर्षीय पत्नीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. धारक याची पत्नी गर्भवती आहे. कौटुंबिक कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. सुनीलने पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

सुनीलने तिच्या पोटात लाथ मारली. मारहाणीत गर्भपात झाला. पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिली. पत्नीला बेदम मारहाण करुन गर्भपातास जबाबदार ठरल्याने पोलिसांनी आरोपी सुनीलच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक एस धायगुडे पुढील तपास करत आहेत.