आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:महिला डॉक्टरचा शिवीगाळ करत विनयभंग, तिच्यासह पतीस जीवे मारण्याची धमकी, आरोपीस अटक, हडपसरमधील घटना

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

30 वर्षीय महिला डॉक्टरचा वेळोवेळी पाठलाग करून, महिलेची जवळीक साधण्याचा प्रयत्न करत महिलेस मारहाण करून तिली व तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीस हडपसर पोलिसांनी अटक केल्याची माहिती मंगळवारी दिली आहे.

अतुल वसंत घुले (वय - 42 ,राहणार- मांजरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत ३० वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार मार्च 2022 ते 30/ 4/2023 यादरम्यान घडलेला आहे.

नक्की प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला यांचे मांजरी येथे क्लिनिक असून सदर आरोपीची क्लिनिकच्या खाली खानावळ आहे. आरोपी हा वारंवार काहीतरी कारण काढून तक्रारदार यांच्या क्लिनिकवर येऊन बोलत बसत त्यांना त्रास देत होता.

पीडित महिलेच्या क्लिनिकमध्ये येत आरोपीने महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. महिलेने नकार दिल्यानंतर आरोपीने महिलेचा हात पकडून तिला मारहाण करून भिंतीवर ढकलून देत अश्लिल शिवीगाळ करत विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एन जाधव याबाबत पुढील तपास करत आहेत.