आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघराजवळ राहणाऱ्या ओळखीच्या महिलेला गाडीवरुन सोडल्याच्या रागातून तिघाजणांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण करीत त्याच्या डोक्यात कोयत्याे वार केला. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या महिलेसह तिच्या मुलावर विटा फेकून मारल्याची घटना पुण्यात घडली आहे.
हडपसरमधील साडेसतरानळी परिसरात घडली असल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.अंतम गायकवाड (वय -37, रा. साठेवस्ती, हडपसर,पुणे ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की काय घडले?
अंतम आणि प्रेमदास शेजारी राहायला असून आठ एप्रिलला अंतम याने प्रेमदासच्या पत्नीला दुचाकीवरुन घरी सोडले होते. त्याच रागातून प्रेमदासने इतर दोघांच्या मदतीने अंतमला बेदम मारहाण केली. तसेच त्याच्यावर शस्त्राने वार करुन गंभीररित्या जखमी केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के पुढील तपास करीत आहेत.
टोळक्याकडून तरूणावर वार
किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणामुळे टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्यावर वार करुन जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना नऊ एप्रिलला संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुण्यातील उंड्री भागात घडल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.
सुफियान शाह असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी रब्बार शेख( वय- ३० रा. मोहमंदवाडी,पुणे) याने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रब्बार आणि सुफियान नऊ एप्रिलला उंड्रीत परिसरात थांबले होते. त्यावेळी चष्मा घालण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून आरोपीने सुफियान याला शिवीगाळ केली.
त्यानंतर टोळक्याला बोलावून घेत त्यांनी सुफियानला बेदम मारहाण करीत त्याच्यावर वार करुन गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस वगरे पुढील तपास करीत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.