आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाही वेगवेगळ्या आमिषांना बळी पडून नागरिक विविध ठिकाणी ऑनलाइन गुंतवणूक करीत आहेत. यात त्यांची फसवणुक झाल्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहे. एका तरुणास क्रिप्टाे ट्रेडिंग मध्ये गुंतवणुक केल्यास चांगल्याप्रकारे परतावा मिळेल असे आमिष दाखवून त्याची 13 लाख 76 हजार रुपयांची फसवणुक करण्यातआलाआहे. या प्रकरणी आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी गुरुवारी दिली.
या प्रकरणी प्रविण नानासाे रसाळ (वय- 30,रा. सिंहगडराेड,पुणे) यांनी सायबर पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार विलंग्रट सिंग असे नाव सांगणारा इसम व वाॅलेट अॅड्रेसचे धारक व वापरकर्ते यांचेवर फसवणुक वआयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यातआलाआहे. सदरचा प्रकार ऑक्टाेबर 2022 पासूनआतापर्यंत घडलाआहे.
पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आराेपी विलग्रट सिंग याने तक्रारदार प्रविण रसाळ यांना रिलायन्स फांऊडेशन या 1600 पेक्षा अधिक सदस्यांचे टेलिग्राम ग्रुपमध्ये अॅड केले. त्यानंतर ग्रुप मधील सदस्यांनी संगनमताने क्रिप्टाे ट्रेडिंग मध्ये गुंतवणुक केल्यास खूप माेठ्या प्रमाणात नफा मिळाल्याचे भासवले.
आराेपींनी तक्रारदार यांना देखील क्रिप्टाे करन्सी ट्रेडिंग मध्ये गुंतवणुक करुन कमी वेळेत जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून गुंतवणुक करण्यास भाग पाडण्यातआले. तक्रारदार यांनी 13 लाख 76 हजार रुपयांची गुंतवणुक केल्यानंतर त्यांना सदर किंमतीचे 2 लाख 60 हजार 758.988 ट्राॅन (टीआरएक्स) हे नमुद वाॅलेट अॅड्रेसवर पाठविण्यास भाग पाडले. परंतु तक्रारदार यांना काेणत्याही प्रकारचा नफा व त्यांची मुळ रक्कम न देता त्यांची 13 लाख 76 हजार रुपयांचीआर्थिक फसवणूक आराेपींनी केली. या गुन्ह्याचा तपास सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पाेलीस निरीक्षक मीनल पाटील करीत आहे.
2 रुपयांचे बदल्यात 37 हजारांचा गंडा
मांजरी येथे राहणारे विजय गणेश वाराेळे (वय- 35) यांनी त्यांचे क्रेडीट कार्ड डिलीव्हरीसाठी गुगलवर ब्लुडार्ट कस्टमर केअर नंबर शाेधून चार ते पाच जानेवारी दरम्यान फाेन केला. त्यावेळी फाेनवरुन अज्ञातआराेपीने त्यांना तुम्हाला जर पार्सल हवे असेल तर दाेन रुपये चार्ज द्यावा लागेल असे सांगितले. त्यानंतर माेबाईलवर एक लिंक पाठवूुन ती तक्रारदार यांनीआेपन केली असताआराेपीने त्यांचे खात्यावरुन परस्पर 37 हजार रुपये काढून घेत फसवणुक केलीआहे. याबाबत बंडगार्डन पाेलीस पुढील तपास करतआहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.