आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन वाइन खरेदी करणे पडले महागात:तरुणीची 97 हजारांची फसवणूक; संशयितावर गुन्हा दाखल

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात राहणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणीने ऑनलाइन वाइन खरेदी करण्याच्या नादात तब्बल 97 हजार रुपयांची फसवणूक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार तीन अज्ञात बँक खातेधारक व माेबाईल धारकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.

काय आहे घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचा प्रकार दहा डिसेंबर राेजी रात्री घडला आहे. संबंधीत तक्रारदार तरुणी हिने ऑनलाईन वाइन खरेदी करण्यासाठी गुगलवर सर्च केले हाेते. त्यानुसार एका माेबाईल क्रमांकावर तरुणीने फाेन केला असता, फाेनवरील इसमाने तिला ऑनलाइन पेमेंटच्या बहाण्याने खाेटी बतावणी करुन तिच्या डेबीट कार्डची गाेपनीय माहिती व युपीआय ट्रान्झेक्शनची रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करण्यास सांगितली. त्यानंतर तिच्या संमती शिवाय परस्पर तिच्या बँक खात्यावरुन भामटयाने 97 हजार रुपये ऑनलाईन दुसरीकडे अनाधिकृतरित्या ट्रान्सफर करुन तिची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत येरवडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) यु.चक्रे पुढील तपास करत आहे.

मनपात नाेकरी लावण्याचे बहाण्याने फसवणूक

पुणे महानगरपालिकेत क्लार्क पदावर नाेकरी लावताे असे खाेटे सांगुन दाेन भामटयांनी दाेन तरुणांची दाेन लाख 86 हजार रुपयांची फसवणुक केली आहे. याप्रकरणी आराेपी शाेभा विजय सुर्यवंशी (रा.रविवार पेठ,पुणे) व सतिश वसंत लालबिगे (रा.कसबा पेठ,पुणे) यांचेवर खडक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनिकेत अनिल मेंढे (34,रा.गुरुवार पेठ,पुणे) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. आराेपींनी मेंढे यांना नाेकरी लावण्याचे खाेटे आश्वासान देऊन त्यांच्याकडून एक लाख 56 हजार रुपये घेतले. परंतु त्यास नोकरीस न लावता त्याची फसवणुक करण्यात आली. अशाचप्रकारे मनपात शिपाई पदावर नाेकरीस लावताे असे म्हणून आराेपींनी तुकाराम भगवान जावळे या तरुणाची एक लाख 26 हजार रुपयांची फसवणुक केली आहे.

सिंहगड राेड परिसरात राहणाऱ्या 49 वर्षीय गायत्री शिवाजीराव सावंत या सहलीला जाण्याकरिता गुगलवर ऑनलाइन टेम्पाे ट्रॅव्हल्स गाडी पाहत हाेत्या. त्यावेळी अनाेळखी आराेपीने त्यांना फाेन करुन त्याचे नाव दिपक शर्मा असे सांगुन मी महाराजा ट्रॅव्हल्स मधून बाेलत असल्याचे सांगितले. ट्रॅव्हल्स बुकिंगकरिता तक्रारदार यांचे व्हाॅटसअपवर एक लिंक पाठवुन त्यावर क्लिक करण्यास त्यांना सांगुन बुकींगकरिता 101 रुपये भरण्यास सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आराेपीने त्यांच्या बँक खात्यातून परस्पर 99 हजार रुपये कट करुन घेऊन त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. याबाबत दत्तवाडी पोलिस पुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...