आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेच्या कस्टमर केअरच्या नावाने महिलेची फसवणूक:ओटीपी शेअर करा म्हणत 1 लाख 21 हजारांना घातला ऑनलाइन गंडा

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका नामांकित बँकेतील कस्टमअर केअर मधून बाेलत असल्याचे सांगत एका भामटयाने 49 वर्षीय महिलेस एक लाख 21 हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राहूल शर्मा नावाचे अज्ञात व्यक्ती विराेधात विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी बुधवारी दिली आहे.

अनिता राघवन (वय-49,रा.विश्रांतवाडी,पुणे) यांनी याबाबत आराेपी विराेधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. आराेपीन राहूल शर्मा याने अनिता राघवन यांना फाेन करुन ताे पंजाब नॅशनल बँकेच्या कस्टमअर केअर मधून बाेलत असल्याचे सांगितले. तक्रारदार यांच्या एटीएम मधून वजा झालेले 20 हजार रुपये परत करताे असे सांगुन त्याने तक्रारदार महिलेचा विश्वास संपादन केला. त्यांना माेबाईलवर आलेला ओटीपी देण्यास भाग पाडून त्यांचे संमती शिवाय परस्पर आराेपीने एक लाख 21 हजार रुपये काढून घेत आर्थिक फसवणुक केली आहे. याबाबत पुढील तपास विश्रांतवाडी पोलिस करत आहे.

पगार न दिल्याने पेंटरला मारहाण करत लुटले

पुण्यातील धायरी परिसरात राहणाऱ्या गाैरव अंकुश शेळके (वय-२०) यांच्याकडे पेटिंगचे काम करत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांना वेळेत पगार न दिल्याचे कारणावरुन त्यांनी चिडून जावुन शेळके यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या डाेक्यात लाकडी फळीने मारुन त्यांना जखमी करुन त्यांचेकडील 74 हजार रुपये किंमतीची साेन्याची चैन, माेबाईल फाेन व पाकीट घेऊन तीन कर्मचारी पसार झाले आहे. याप्रकरणी धर्मेंद्र, संदीप व संताेष (सर्व रा.पुणे) या आराेपी विराेधात लाेणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साेनसाखळी चाेराने 72 हजारांचे साेन्याचे गंठण चाेरले
काेंढवा परिसरात साळवे मंगल कार्यालयाचे समाेरील मुळीक टाॅवर समाेरील सार्वजनिक रस्त्यावरुन सहा डिसेंबर राेजी ललिता विलास ननावरे (वय-44) या पायी जात हाेत्या. त्यावेळी काळया रंगाच्या माेटारसायकलवर आलेल्या दाेन अनाेळखी इसमांनी त्यांचे गळयातील 72 हजार रुपयांचे 23 ग्रॅम वजनाचे साेन्याचे गंठण जाेरात हिसका मारुन जबरदस्तीने खेचून पसार झाले आहे. याप्रकरणी दाेन अनाेळखी चाेरटया विराेधात काेंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...