आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:पुण्यातून 55 लाखांचा गुटखा खेड शिवापूर येथे जप्त, कारचालकास अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरातून कारमधून घेऊन जाणारा 55 लाख 62 हजार 712 रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी एका आरोपीस खेड शिवापूर परिसरातून पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

रमेश मोतीराम चौधरी, (वय -37वर्षे, रा श्रीरामनगर, ता हवेली जि -पुणे) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहे. या प्रकरणात गुटख्यासह गुन्ह्यात वापरण्यात आलेली ब्रिजा कार व इतर मुद्देमाल असा एकूण 65 लाख 18 हजार 712 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुणे शहरात कारमध्ये घेऊन निघालेला गुटखा साठवर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत, खेड शिवापूर परिसरातून ५५ लाख ६२ हजार ७१२ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी रमेश मोतीराम चौधरी, (वय -३७ वर्षे, रा श्रीरामनगर, ता हवेली जि -पुणे) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहे. या प्रकरणात गुटख्यासह गुन्ह्यात वापरण्यात आलेली ब्रिजा कार व इतर मुद्देमाल असा एकूण ६५ लाख १८ हजार ७१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना माहिती मिळाली की, राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड शिवापूर मार्गावरुन पुण्यात गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या अनुषंगाने महामार्गावर सापळा रचला. दरम्यान एक संशयित एक पांढरे रंगाची ब्रिझा कार नं एम. एच. १२ टी. एस. १६१४ या मध्ये विमल कंपनीचा गुटख्याचे एक पोते आरोपी रमेश मोतीराम चौधरी, याचेकडून जप्त केले आहे. तसेच त्याने सदर गुटख्याचा माल त्याचे शिंदेवाडी येथील गोडाऊन मधून आणला असल्याचे सांगून कोंढणपूर रोडवर श्रीरामनगर येथे एक गोडाऊन असल्याचे त्याने सांगितले. दोन्ही गोडाऊनची पोलिसांनी तपासणी केली असता विमल, आर. एम. डी. रजनीगंधा, राजनिवास, राजश्री, व्ही-१ नावाचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला व तंबाखु असा एकुण ५५ लाख ६५ हजार किंमतीचा माल, साडेतीन लाख रुपये रोख, दोन मोबाईल फोन व एक ब्रिझा कार असा एकुण ६५ लाख १८ हजार किमतीचा मिळून आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रमेश मोतीराम चौधरी यास ताब्यात घेवून राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवून ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

सदरची कामगिरी अंकित गोयल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मितेश गट्टे अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे, भाऊसाहेब ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि महादेव शेलार, पोसई प्रदीप चौधरी, पोहवा. सचिन घाडगे, पोहवा. अजित भुजबळ, पोहवा गुरू जाधव, पोहवा गोरख पवार, राजगड पोस्टे कडील सपोनि मनोजकुमार नवसरे, पोहवा संतोष तोडकर, यांनी केली आहे.