आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Pune Crime Update | Jewelers Worth Three Lakhs Were Looted By Thieves By Tearing Down The Wall Of Saraf Shop, A Case Has Been Registered

भिंत फोडून तीन लाखांचे दागिने लंपास:कोंढवा परिसरातील सराफ दुकानात चोरट्यांनी मारला डल्ला

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोंढवा परिसरातील सराफा दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी तीन लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी रात्री दुकानात प्रवेश करून दागिन्यांसह 15 हजार रुपयांचा डीव्हीआर लंपास केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.

असा केला प्रवेश

याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात मालमसिंह पिरसिंग राठोड (वय-42,रा.कोंढवा, पुणे) यांनी अज्ञात आरोपी विरोधात पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. सदर घटना 30 जुलै राेजी रात्री साडेसहा ते 31 जुलै राेजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. तक्रारदार मालमसिंह राठोड यांचे उंड्री चाैकात न्यू खिमंडे ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. सदर सराफाचे दुकान नेहमी प्रमाणे बंद करुन राठाेड घरी गेले असताना, अज्ञात आराेपींनी सराफ दुकान व शेजारील शाळेची सामाईक भिंत कशाचे तरी सहाय्याने रात्री ताेडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातून तीन लाख रुपये किंमतीचे 4940 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व 15 हजार रुपये किंमतीचे डीव्हीआर असा मुद्देमाल लबाडीच्या उद्देशाने चोरी करुन नेला आहे.

माग काढणे सुरू

राठोड हे सकाळी दुकानात आल्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला. याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दिल्यानंतर, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह तपास पथकांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. श्वान पथकासही घटनास्थळी बोलवून आराेपींचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहे.

लाखोचा माल चोरीला

लाेणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाघाेली येथील साईसत्यम पार्क याठिकाणी असलेल्या चौधरी हार्डवेअर दुकानातील शटरचे बाजूचा दरवाजाचा कडी काेयंडा काेणीतरी अज्ञात चाेरटयांनी 31 जुलै राेजी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास ताेडून त्यावाटे दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील एक लाख 55 हजार रुपये किमतीचे पॉलीकॅप कंपनीचे केबल वायर व राेख 14 हजार रुपये असा एकूण एक लाख 69 हजार रुपये किमतीचा माल चाेरुन नेला आहे. याबाबत छत्राराम मालाराम चाैधरी (वय-53) यांनी लाेणीकंद पोलिस ठाण्यात अज्ञात आराेपी विराेधात तक्रार दिली आहे. तर, दुसऱ्या घटनेत दत्तवाडी येथील ओमकार हाैसिंग साेसायटी येथील चेतन राजेंद्र शर्मा (35) यांच्या चेतन मेडिकलच्या दुकानाचे शटर उचकटून काेणीतरी अज्ञात व्यक्तीने दुकानात प्रवेश करून मेडिकलमध्ये ड्रॉव्हरमधील 40 हजार 500 रुपये किंमतीची रक्कम चोरी करुन नेली आहे.

बातम्या आणखी आहेत...