आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकमेकांचे घराशेजारी राहणाऱ्या महिलेने दुसऱ्या महिलेस ‘तु पाकिस्तानी आहे, तुला दहा नवरे असतील, तु इथे रॅकेट चालवते, तुमचे सर्वांचे पासपोर्ट' काढून घेतले पाहिजेत, यांना पाकिस्तानला पाठविले पाहिजे’ अशी धमकी देत हाताची नस कापण्याची भिती दाखवल्याने हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहचले आहे.
त्यानुसार, वानवडी पोलिस ठाण्यात 45 वर्षीय महिलेने घराशेजारी राहणाऱ्या महिले विरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती मंगळवारी दिली. सदरचा प्रकार जुलै महिंन्यापासून सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारदार महिला आणि आरोपी महिला महिला या शेजारी राहतात. त्यांच्यात वादविवाद सुरू आहेत. तक्रारीत महिलेने नमूद केले की, मला शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या महिलेने दारू पिऊन मारहाण केली. तसेच ‘ तु पाकिस्तानी आहे, तुला दहा नवरे असतील, तु इथे रॅकेट चालवते, तुमचे सर्वांचे पासपोर्ट काढून घेतले पाहिजेत, तुला पाकिस्तानला पाठविले पाहिजे. असे नमूद केले आहे.
तक्रारदार महिलेस व तिच्या पतीस धमकी
तक्रारदार व त्यांच्या पती यांना वारंवार बोलून इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन तक्रारदार यांना ‘तुझे आणि तुझ्या मुलीचे आंघोळीचे व बाथरुमला गेल्याचे व तुम्ही कपडे बदलते वेळीचे तुमचे व्हिडिओ कसे व्हायरल करते बघ' असे म्हणून धमकी दिली.
त्याचप्रमाणे तक्रारदार व त्यांचे मुलीवर पाळत ठेऊन वारंवार स्वत:ची नस कापण्याची भिती दाखवून तक्रारदार यांचे विरोधात पोलिसात खोटी तक्रार करण्याची धमक देऊन त्यांचे चारित्र्यावर अश्लिल टिप्पणी करत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास वानवडी पोलिस करत आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग,
पुण्यातील चतुश्रृंगी परिसरात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. सदर मुलगी घरातील मिक्सर खराब असल्याने शेजारी राहणाऱ्यांचे घरी मसाला वाटण्यासाठी गेली होती. त्यावेळी 32 वर्षीय इसमाने तिच्या जवळ जाऊन तिला स्वत:कडे ओढून घेत तिच्या शरीरास वाईट हेतूने स्पर्श केला. मुलीच्या मनास लाज वाटेल असे कृत्य केले. त्यानंतर पुन्हा दोन दिवसाने पीडित मुलीस व तिच्या आईला घरी बोलवून त्यांच्यासोबत वाद घालुन शिवीगाळ केली. त्यांची बदनामी करू लागल्याने पोलिसांकडे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यावर आरोपीस अटक करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.