आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यातील कार्यक्रमांना स्थगिती:पुण्यातील अनेक सांस्कृतिक नियोजित कार्यक्रमांना स्थगिती, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे झाला निर्णय

पुणे2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी - Divya Marathi
मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी
  • संस्था, शैक्षणिक आस्थापना, गाणी आणि व्याख्यानांसह पुस्तक प्रकाशन स्थगित

पहिल्या टप्प्यातील प्रदीर्घ लॉकडाऊन नंतर मर्यादित प्रमाणात सुरू झालेल्या पुण्यातील अनेक सांस्कृतिक नियोजित कार्यक्रमांना नव्याने वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे स्थगिती देण्यात आली आहे. तसेच काही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अनेक संस्था, ट्रस्ट, शैक्षणिक आस्थापना तसेच गाणी, व्याख्याने, परिसंवाद, चर्चा, पुस्तक प्रकाशन आदी कार्यक्रमांना नव्याने जारी करण्यात आलेल्या शासकीय आदेशांचे पालन करण्यासाठी नियोजित कार्यक्रमात बदल करावा लागला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार व सध्याच्या कोरोनाविषयक परिस्थितीमुळे दि. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने नियोजित दिवाळी अंक पारितोषिक वितरण समारंभ आणि दि. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी, मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध साहित्य पुरस्कार प्रदान समारंभ सध्या पुढे ढकलण्यात आले आहेत. पुढील तारखा परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर कळविण्यात येतील. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी कळविली आहे.

त्याचप्रमाणे पुण्यभूषण फाऊंडेशनच्या वतीने २६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभही पुढे ढकलण्यात आला आहे. याशिवाय काही पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम देखिल स्थगित करण्यात आले आहेत, अशी माहिती मिळाली.