आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीटकाॅईन गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आराेपी माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील आणि सायबर तज्ञ पंकज घोडे यांच्या विरोधात 400 पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. याबाबत एकूण 25 साक्षीदार यांचे जबाब पोलिसांनी जबाब नोंदवले आहे. पुणे सायबर पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांच्या न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल केले.
पाटील यांच्याकडील चौकशीत पोलिसांनी त्याच्या ताब्यातून विविध 34 प्रकारची सहा काेटी रुपयांची क्रिप्टाे करन्सी जप्त केली आहे. पाटील याने त्याचे कुटुंबीय व नातेवाईक यांच्या नावावर क्रिप्टाे करन्सीचे वाॅलेट काढून त्यात आराेपींच्या खात्यातून बीटकाॅईन वर्ग केल्याची बाब ही तपासात निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी त्याची पत्नी आणि भाऊ यांच्या विरोधात ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
रविंद्र पाटील याचे आयपीएसच्या नाेकरीत मन रमले नाही आणि अल्पावधीत त्याने राजीनामा देऊन खासगी कंपनीत ताे रुजू झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील के.पी.एम.जी. या नामांकित कंपनीत ताे ई-डिस्कव्हरी, सायबर तज्ञ म्हणून वरिष्ठ पदावर काम करत हाेता. त्याचप्रमाणे चीनमध्ये हाँगकाँग येथेही काही काळ त्याने काम केले. पुणे पाेलिसांकडे सन 2017मध्ये अमित भारद्वाज आणि विवेक भारद्वाज यांच्या विराेधात दत्तवाडी व निगडी पाेलिस ठाण्यात दाखल झालेल्या बिटकाॅईनच्या गुन्ह्यात पुणे पाेलिसांनी सायबर तज्ञ म्हणून काम करत हाेता. मात्र, यादरम्यान त्यांनी सदर गुन्ह्याचा तांत्रिक तपास करताना, आराेपींच्या खात्यावरील क्रिप्टाे करन्सी परस्पर इतर खात्यात वळविल्याचे तसेच खात्यावर कमी बीटकाॅईन असल्याचे स्क्रीनशाॅट दाखविल्याचे केवायसीच्या रिपाेर्ट मधून दिसून आले आहे.
आतापर्यंत रविंद्र पाटील याने 236 बीटकाॅईन इतरत्र वळविल्याचे चाैकशीत निष्पन्न झाले आहे. बीटकाॅईन गुन्ह्यातील पैशातून त्याने वेगवेगळया ठिकाणी गुंतवणुक केल्याचे ही स्पष्ट झाले असून त्याबाबत पाेलीस अधिक चाैकशी करत आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण करत आहे.
पंकज घाेडेची परदेशात गुंतवणुक
सदर गुन्हयातील आराेपी पंकज घाेडे हा ग्लाेबल ब्लॅकचेन फाऊंडेशन कंपनी चालवत हाेता. सायबर तज्ञ म्हणून पाेलीसांसाेबत काम करताना त्याने ही आराेपींच्या खात्यातून बीटकाॅईन इतरत्र वळवून फसवणुक केली आहे. आराेपींच्या खात्यावर बिटकाॅईन शिल्लक असतानाही बिटकाॅईन नसल्याचे स्क्रीनशाॅट त्याने पाेलिसांना दिले असल्याचे उघड झाले आहे. त्याच्या क्रिप्टाे करन्सी वाॅलटच्या तपासणीत त्याने हजाराे युराे, डाॅलरचे आर्थिक व्यवहार परदेशात केल्याचे दिसून आले असून याबाबत पाेलिस तपास करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.