आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडाॅक्टरांची पत्नी बोलत असल्याचे भासवत मेडीकल साहित्य मागवले. कामगार ते घेवून गेल्यानंतर त्याच्याकडील 10 हजार रुपये घेऊन भामट्याने गंडवत पलायन केले. याप्रकरणी मुकेश बालचंद जैन ( वय -50, राहणार - बिबेवाडी, पुणे )यांनी अज्ञात आरोप विरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
डॉक्टर जोशी यांची पत्नी मिसेस जोशी बोलत असल्याचे सांगून मोबाईलवर एका मेडिकल व्यवसायकाला कंबरेचा पट्टा आणि वॉकर हॉस्पिटलला पाठवण्यास सांगण्यात आले. माझ्याकडे दोन हजारांच्या नोटा असून तुमच्याकडे 500 रुपयांच्या जितक्या नोटा असतील, त्या नोटा मला द्या, त्याबदल्यात मी तुम्हाला दोन हजारांच्या नोटा देते असे सांगण्यात आले. त्याप्रमाणे मेडिकल व्यावसायिकाचा कामगार दहा हजार रुपये घेऊन गेला असता, त्याच्याकडील पैसे आज्ञात व्यक्तीने घेऊन तो पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुकेश जैन यांचे पुणे सातारा रस्त्यावर शाहू बँक चौकात एम जे सर्जिकल मेडिकल आहे. त्यांना अज्ञात नंबरवरून एका महिलेने फोन करून, तिचे नाव मेसेज जोशी असल्याचे सांगितले.
''मी डॉक्टर जोशी यांची पत्नी असून मला एक कंबरेचा पट्टा आणि वॉकर पाहिजे आहे, ते हॉस्पिटलला पाठवण्यास सांगून, माझ्याकडे दोन हजारांच्या नोटा आहे तुम्ही मला ५०० रुपयेच्या जेवढ्या नोटा असतील, तेवढ्या नोटा सुट्टे द्या ,त्या बदल्यात दोन हजाराच्या नोटा देते.'' असे महिलेने सांगितले.
त्यानुसार मेडिकल व्यावसायिकाचा कामगार रवींद्र कुमार हा कंबरेचा पट्टा आणि वॉकर व 500 रुपयांच्या वीस नोटा असे दहा हजार रुपये रोख रक्कम घेऊन संबंधित ठिकाणी गेला. त्यावेळी रविंद्र कुमार यास जिन्यामध्ये एक व्यक्ती भेटून, त्याने मला जोशी मॅडमनी पाठवले असून सुट्टे पैसे माझ्याकडे दे व सदर सामान तिसऱ्या मजल्यावर देऊन ये, तोपर्यंत मी तुला पैसे देण्यासाठी खाली मेडिकलमध्ये थांबतो असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांचे पैसे घेऊन आरोपी पसार होऊन त्यानी फसवणूक केली आहे. याबाबत सहकारनगर पोलीस पुढील तपास करत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.