आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:अपघातात अपंग झालेल्या गाईला पुण्यातील डॉक्टरांनी बसवला कृत्रिम पाय, संचेती रुग्णालयातील डॉक्टरांची कामगिरी

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गाईला चारही पायांवर उभे करण्यासाठी संचेती रुग्णालयाच्या पथकाने डॉक्टरांची टीम तयार केली होती

पुण्यातील संचेती रुग्णालयाने तीन पायांनी अपंग असलेल्या एका गाईला नवीन जीवनदान दिले आहे. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तिला कृत्रिम पाय लावून पुन्हा उभे केले. सध्या गाईची प्रकृती ठीक असून ती चारही पायांवर फिरू शकते. एका अपघाताच्या वेळी तिचा पाय कापावा लागला होता.

संचेती रुग्णालयातील प्रोस्थेटिक आणि ऑर्थोटिक्स विभागाचे प्रमुख डॉक्टर सलील जैन यांच्या टीमने हा कृत्रिम पाय तयार केला आणि पुणे-सोलापूर राज्य मार्गावरील एका गो शाळेतील गाईला बसवला आहे. पुण्यातील रहिवासी फार्मासिस्ट अमर जगताप यांनी काही महिन्यांपूर्वी या गोशाळेला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी या अपंग गाईला पाहिले. यानंतर त्यांनी रुग्णालयाशी संपर्क साधला. हॉस्पिटलने एक टीम तयार करून या गाईला कृत्रिप पाय बसवण्याची तयारी सुरू केली.

डॉक्टरांनी यशस्वीरित्या बसवला कृत्रिम पाय

डॉक्टर जैन यांनी सांगितले की, प्राण्यांना कृत्रिम पाय बसवणे लहान मुलांनी बसवण्यासारखे आहे. प्राणी तुमच्याशी बोलू शकत नाहीत. प्राण्याला पाय बसवल्यानंतर चालण्यास त्रास होत आहे की नाही यासाठी तुम्हाला तासन्तास परिक्षण करावे लागते. गाय आता उभी राहू शकते आणि हळू-हळी चालते. पण कृत्रिम पायाची सवय होण्यास तिला किमान एक महिना लागेल.

बातम्या आणखी आहेत...