आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआई ही संशोधक, विकासक, व्यवस्थापक आणि सेवा देणारी निसर्गाने निर्माण केलेली संस्था आहे. भारताच्या आर्थिक विकासात आणि देश उभारणीत महिलांचा सहभाग खूप मोठा आहे. भारतीय संस्कृती ही महिलांचा सन्मान करणारी आहे असे मत शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
भारत अस्मिता फाउंडेशन व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’२०२३ प्रदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी एमआयटीचे संस्थापक प्रा.डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ तपण पांडा उपस्थित होते.
यावर्षी लखनऊ येथील आयआयएमच्या संचालिका प्रा.डॉ.अर्चना शुक्ला यांना भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार, ओडिसाच्या खासदार प्रमिला बिसाई यांना ‘भारत अस्मिता जन प्रतिनिधि श्रेष्ठ पुरस्कार’, खबर लहरियाच्या मुख्य संपादिका कविता देवी बुंदेलखंडी व प्रसिद्ध अभिनेत्री नंदिता दास यांना ‘भारत अस्मिता जन जागरण श्रेष्ठ पुरस्कार’, रॉकेट वूमन व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रितू करिधाल यांना ‘भारत अस्मिता विज्ञान-तंत्रज्ञान श्रेष्ठ पुरस्कार’ आणि भारत अस्मिता जीवन गौरव पुरस्कार रॉथचाईल्ड इंडियाच्या अध्यक्षा पद्मश्री नयनालाल किडवाई यांना भारत अस्मिता विशेष जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रत्येकी सव्वा लाख रूपये रोख, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ.माशेलकर म्हणाले,भारत हा सुसंस्कृत, समृध्द, सुरक्षित आणि समाधानी देश आहे. हा देश संपूर्ण जगाचे स्वप्न पूर्ण करणारा आहे. त्यामुळे ही इंडिया अस्मिता नसून भारत अस्मिता जपणारा देश आहे.युवकांमध्ये स्वत्व, स्वधर्म, स्वाभिमान जागविण्यासाठी भारत अस्मिता पुरस्काराची भूमिका महत्वाची आहे. यातूनच शांतीपूर्ण समाज स्थापन करण्यास मदत मिळेल. २१ व्या शतकात भारत विश्व गुरू म्हणून उदयास येईल. त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे असे मत डॉ कराड यांनी व्यक्त केले.
अर्चना शुक्ला म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी केवळ माहिती घेण्यासाठी वर्गात येऊ नये तर स्वतःच्या संशोधनातून काही वेगळे निर्माण करण्याची आवश्यकता आहे. शिक्षकांनी केवळ माहितीचे प्रसारण न करता संशोधनात्मक वृत्ती निर्माण करण्याचे कार्य करावे. सार्वजनिक क्षेत्रात स्त्रियांचे योगदान वाढावे यासाठी महिलांना रोजगार व त्यांच्या सबलीकरणासाठी कार्य करावे. लोक सहभाग आणि लोक श्रमदानातून अनेक गावांना एकत्र आणून जलसंधारण, वृक्षलागवडीसारखे पर्यावरण विकासाचे शाश्वत उपक्रम राबविले आहेत असे प्रमिला बिसोई यांनी भावना व्यक्त केली.
डॉ. रितू करिधाल म्हणाल्या, शिक्षणामुळेच हा देश पुढे जात आहे. अंतराळ विज्ञानाने सृष्टीवरील मानवजातीचे जीवनमान उंचावले आहे. सॅटेलाइट व मंगळयानावर जे कार्य केले आहे तो एक सुवर्ण इतिहास आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.