आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी व गृहवित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांनी तब्बल 500 जणांना फसवल्याचा आरोप करत पुणेकर नागरिक कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वित्त संस्थांच्या कार्यालयांसमोर गुंतवणुकींची रक्कम मिळावी म्हणून निदर्शने करण्यात आली.
अशी केली गुंतवणूक
पुण्यातील टिळक रस्त्यावरील टाटा कॅपिटल कार्यालय, शिवाजीनगर येथील एसडीएफसी बँक व पाताळेश्वर मंदिराजवळील पीएनबी हौसिंग फायनान्स याठिकाणी आंदोलन करण्यात आले. याबाबत पुणेकर नागरिक कृती समितीचे मिहिर थत्ते म्हणाले, डीएस कुलकर्णी यांचे तर्फे पिरंगुट येथे गृहबांधणी योजना राबविण्यात येणार होती. या योजनेत पुणे-मुंबई व राज्यातील इतर मोठया शहरातून सुमारे 500 कुटुंबानी गुंतवणूक केली. योजनेत किमतीच्या दहा टक्के प्रमाणे डीएसके यांच्याकडे गुंतवले होते व त्याला पाच वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. हा प्रकल्प चार विविध नावांनी जाहीर करण्यात आला होता.
एकही इमारत उभी नाही...
मिहिर थत्ते म्हणाले, गुंतवणूकदारांना याठिकाणी 12 मजल्याच्या आठ इमारती उभ्या राहणार असल्याचे जाहिरातीद्वारे सांगितले गेले. याकरिता तीन मोठ्या नावाजलेल्या गृहविध संस्थांनी कर्ज पुरवठा करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार ग्राहकांनी दहा टक्के रक्कम भरुन 90 टक्के गृहवित्त संस्थाचे कर्ज घेतले, परंतु डीएसके पाच वर्षांपेक्षा अधिक काळ कारागृहात आहेत. त्यामुळे निर्धारित आठ इमारतीपैकी एक ही इमारत अद्याप उभी राहू शकली नाही.
बँकांचे तगादे सुरू...
मिहिर थत्ते म्हणाले, गृहवित्त संस्थांनी एकूण प्रकल्प किमतीच्या किमान 50 टक्के व कमाल 70 टक्केचे वितरण बेकायदेशीरपणे डीएसके यांना केले. घर खरेदी करणाऱ्यांच्या नावे ज्याच्या त्याच्या फ्लॅटच्या मागणीप्रमाणे त्या कर्ज रक्कमा वर्ग केल्या. प्रत्यक्षात एकालाही घर मिळाले नाही. मात्र, कर्ज व त्यावरील व्याज प्रत्येकाच्या डोक्यावर बसले आहे. कर्ज वसुलीसाठी कर्जदारांकडे वित्तीय संस्थांचे तगादे सुरू झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.