आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:शाळकरी मुलाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू; हडपसरच्या साधना विद्यालय परिसरातील घटना

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका सोळा वर्षीय शाळकरी मुलाचा हडपसर परिसरातील साधना विद्यालयाच्या जलतरण तलावात बुडून दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.कृष्णा गणेश शिंदे (वय- 16, रा. माळवाडी, हडपसर,पुणे) असे मयत झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद पोलिसांकडून दाखल करण्यात आली आहे.

हडपसर मधील साधना विद्यालयात कृष्णा शिंदे हा नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता आणि माळवाडी परिसरातील काळुबाई वसाहतीत कुटुंब सह राहण्यास होता. साधना शाळेच्या प्रवेशद्वारा जवळ जलतरण तलाव आहे. कृष्णा आणि त्याचा मामा पोहन्यासाठी गेले होते. पोहून झाल्यानंतर त्याचा मामा जलतरण तलावातून बाहेर आला. त्यावेळी कृष्णा जलतरणातून बाहेर आला नसल्याचे मामाच्या लक्षात आले. त्यामुळे कृष्णा पाण्यात बुडाल्याचे समजल्यानंतर त्याला तातडीने शोधून पाण्याच्य बाहेर काढण्यात आले आणि त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

साधना शाळेतील जलतरण तलावात जीवरक्षक होते का नाही, याबाबतची चौकशी पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. कृष्णा शिंदे हा घरात एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूनंतर स्थानिक रहिवाशंनी हळहळ व्यक्त केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत कृष्णाचा मृत्यू बुडून झाल्याचा संशय आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यूमागचे निश्चित कारण समजू शकेल अशी माहिती हडपसर पोलिसांनी दिली आहे.

पीएमपी बसला दुचाकी धडकून चालकाचा मृत्यू

पुणे-अहमदनगर रस्त्यावर खराडीजवळ बीआरटी मार्गात पीएमपी बसला वेगात दुचाकी धडकून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अभिषेक राजेंद्र माने (वय -21, रा. भाडळे रस्ता , वाघोली ,पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार चालकाचे नाव आहे. पीएमपी बस अहमदनगर रस्त्याकडून पुण्याकडे येणाऱ्या बीआरटी मार्गातून निघाली होती. नियमाचे उल्लंघन करून दुचाकीस्वार अभिषेक भरधाव वेगाने सदर बीआरटी मार्गातून वेगात निघाला होता. खराडीजवळ बीआरटी मार्गात दुचाकीस्वार अभिषेक याचे नियंत्रण सुटले आणि तो बसवर जोरात आदळला. गंभीर जखमी झालेल्या अभिषेकला नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच तो मरण झाला होता.