आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमानवीय:रस्ते बंद, रुग्णवाहिका नाकारली: दोन तास दिली मृत्यूशी झुंज, मेल्यानंतरही रात्रभर रस्त्यावर ठेवावा लागला मृतदेह

पुणेएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक
  • मृत्यूनंतर मुक्ती मिळते असे म्हटले जाते, पण सिस्टिमने या मृतदेहाला मृत्यूनंतरही छळले

कोरोना रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाउन कसा लोकांच्या जीवावर उठला याचे दयनीय उदाहरण पुण्यात समोर आले. एका 65 वर्षांच्या वृद्धाला छातीत कळ येते. पत्नी, बहीण, मुलगा आणि सासू त्याला घेऊन रस्त्यावर येतात. रुग्णवाहिकेसाठी रुग्णालयांना फोन करतात. परंतु, काहीच प्रतिसाद मिळत नाही. कोरोनाची इतकी भीती की भीती की डॉक्टर किंवा प्रशासन त्याला हात लावण्यासही तयार नाही. त्यात लोकांनी आणि प्रशासनाने ठिक-ठिकाणी बांबू आणि पत्रे लावून रस्तेही बंद केले. साधे ऑटो रिक्शा सुद्धा बाहेर पडू देत नाहीत. दोन तास तडफडल्यानंतर अखेर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यूने माणसाची छळातून सुटका होत असते असे म्हटले जाते, परंतु या व्यक्तीला मृत्यूनंतर सुद्धा छळ सहन करावा लागला आहे.

मृतदेहाला रात्रभर असे रस्त्यावर बसवले...

ही घटना नानापेठ परिसरात शुक्रवारी संध्याकाळी घडली. हा परिसर सध्या रेड झोन आहे. रुग्णवाहिकेसाठी फोन केला असता वारंवार केवळ पोकळ आश्वासनेच देण्यात आली. स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे, हा मृतदेह रुग्णालयात घेउन जाण्यासाठी पोलिसांनी देखील मदत केली नाही. स्थानिकांनीच एक दोन खुर्च्या दिल्या. त्यापैकी एक खुर्चीवर मृतदेहाला ठेवण्यात आले. त्याच्या मागे पीडितची सासू, डाव्या बाजूला एका स्कूटीवर कशी बसी पत्नी डोक्याला हात लावून बसलेली. उजव्या बाजूला मुलगा आणि त्याची बहीण... काय करावे कुणालाच सूचत नव्हते. अशातच काही नागरिकांनी या घटनेचे वर्णन करणारा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि प्रशासनाचा गलथाणपणा उघडकीस आणला. मृत व्यक्तीचे पोट मोठे असल्याने त्याला ऑटोरिक्शामध्ये सुद्धा नेणे शक्य नाही असे एकाने सांगितले.

रात्री 3 वाजता आला टेम्पो

रात्रभर खटाटोप केल्यानंतर अखेर पहाटे 3 वाजल्यानंतर एक टेम्पो परिसरात आणण्यात आला. याच टेम्पोमध्ये मृतदेह टाकला आणि ससूनला नेण्यात आले. सूत्रांच्या माहितीप्रमाणे, या व्यक्तीला हृदयविकाराचा त्रास होता. त्यामुळेच मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यातच या व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली नव्हती असेही समोर आले. जिवंत होता तेव्हा डॉक्टर हात लावायला सुद्धा तयार नव्हते. आता या मृतदेहावर पोस्टमॉर्टम केले जातील. त्याला कोरोना होता की नव्हता अशा चाचण्या घेतल्या जातील. विनाकारण मृत्यूची कारणे शोधली जातील. पण, यातून तो जीव काही परत येणार नाही हे विसरायला नको.

बातम्या आणखी आहेत...