• Home
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Pune Factory Fire Update | Pune MIDC Chemical Factory Fire Accident Today Latest News And Updates, Fire Tenders Were Rushed To The Spot

पुण्यात स्फोट / रासायनिक कारखान्यात मोठा स्फोट; पाच किमी पर्यंत ऐकू गेला स्फोटाचा आवाज; अग्निशमन दलाचे 6 बंब घटनास्थळी

  • स्फोटाच्या वेळी कारखान्यात किती लोक होते याचा तपास सध्या केला जात आहे

दिव्य मराठी

May 22,2020 12:52:31 PM IST

पुणे. दौंडच्या करकुंभ येथील एमआयडीसी परिसरात कारखान्यामध्ये मोठा स्फोट शुक्रवारी घडून आला आहे. रासायनिक कारखान्यात घडलेला हा स्फोट इतका मोठा होता की 5 किमी दूरपर्यंत लोकांना त्याचा आवाज ऐकू आला. स्फोट होताच कारखान्यात आग लागली. यात कारखान्याचा एक भाग जळून खाक झाला आहे. फायर ब्रिगेडने दिलेल्या माहितीनुसार, ही आग कुसुम डिस्टिलेशन अँड रिफायनरी नावाच्या कंपनीत लागली आहे. अग्निशमन दलाचे 6 बंब घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या या घटनेत कुठल्याही जीवित हानीचे वृत्त नाही. सोबतच स्फोट घडला त्यावेळी कारखान्यात किती लोक उपस्थित होते याची देखील माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थली पोहोचून संपूर्ण परिसर सील केला आहे. कारखान्याच्या सभोवताल मोठ्या संख्येने बघ्यांनी गर्दी केली होती. त्यांना देखील दूर करून या ठिकाणी बॅरिकेट लावण्यात आले आहेत. ही घटना घडली त्यावेळी कारखान्यात कुणी उपस्थित होते का? सोबतच हा स्फोट नेमका कसा घडला याचा सविस्तर तपास सध्या केला जात आहे. यासंदर्भात पोलिस अधिकारी कारखान्यातील व्यवस्थापक आणि मालकाची देखील चौकशी करत आहेत.

X