आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका कुटुंबात 21 रुग्ण:6 महिन्यांच्या बाळापासून 80 वर्षांच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले संक्रमण, पुण्यातील एकाच कुटुंबात 21 जण कोरोना पॉझिटिव्ह

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 24 जणांच्या कुटुंबात केवळ 3 कोरोना निगेटिव्ह

पुण्यातील मांडवगण फराटा गावात एकाच घरातील 21 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. खेड तालुक्यात असलेल्या या गावातील प्रशासनाला याची माहिती मिळताच घर सील करण्यात आले आहे. या कुटुंबातील सदस्यांवर उपचार सुरू झाले असून एक-एक करून त्यांच्यात सुधारणा देखील होत आहे.

24 जणांच्या कुटुंबात केवळ 3 कोरोना निगेटिव्ह
मांडवगण फराटा येथील जगताप कुटुंबात 6 महिन्यांच्या बाळापासून 80 वर्षांच्या पंजोबांपर्यंत सगळेच कोरोना पॉझिटिव्ह आहेत. या कुटुंबात 13 पुरुष आणि 11 महिला आहेत. त्यापैकी केवळ 3 जणांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह असून उर्वरीत सगळेच संक्रमित आहेत. जगताप कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णपणे शेतीवर विसंबून आहे. कोरोना झालेल्या कुटुंबातील बहुतांश सदस्यांना कुठलीही लक्षणे नाहीत.

एका सदस्यामुळे सर्वांना झाले संक्रमण
जगताप कुटुंबातील एक व्यक्ती अशोक टरबूज विक्रेता आहे. अशोक दिवसभर गल्लो-गल्ली जाऊन टरबूज विकत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याला कोरोनाची लक्षणे दिसून आली. टेस्ट केली तेव्हा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यानंतर कुटुंबातील इतर सर्वच सदस्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. तेव्हा आणखी 20 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले.

6 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले
कोरोना संक्रमित झालेल्या कुटुंबातील 21 जणांपैकी 6 वयोवृद्ध सदस्यांची प्रकृती सुधारत नव्हती. त्यामुळे, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या सर्वांवर मांडवगण फराट येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांनी एका सदस्यांची प्रकृती बिघडल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. इतर 15 सदस्यांना घरातच उपचार दिले जात आहेत. नियमानुसार, त्या सर्वांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

पुणे शहरात 38 हजार सक्रीय कोरोना रुग्ण
पुणे शहरात गेल्या 24 तासांत 2451 कोरोना रुग्ण समोर आले आहेत. यानंतर आतापर्यंत संक्रमित झालेल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4.41 लाख झाली. गेल्या 24 तासांत 61 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे पुण्यात 7245 जीव गेल्याची सरकारी आकडेवारी आहे. दिवसभरात 3491 रुग्ण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. सद्यस्थितीला शहरात 38,481 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...