आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायलेकाची हत्या:पिकनिकवर गेलेल्या पुण्यातल्या कुटुंबातील आधी आईची हत्या, मग मुलाचाही मृतदेह सापडला; पतीचा अद्याप पत्ता नाही

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात पिकनिकवर गेलेल्या एका छोट्या कुटुंबासोबत जे घडले त्याचा कुणी विचारही केला नसेल. आपल्या 8 वर्षांच्या मुलाला घेऊन फिरण्यासाठी निघालेल्या तरुण आई आणि वडिलांपैकी आधी आईचा मृतदेह सापडला. तिच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर तिच्या मुलाचा देखील अशाच पद्धतीने खून करण्यात आल्याचे समोर आले. यातील पतीचा अद्याप काहीच पत्ता लागलेला नाही.

पुण्याजवळील सासवड मध्ये काल सकाळी (15 जून) एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. आता त्या महिलेच्या आठ वर्षाच्या मुलाचाही खून झाल्याचे समोर आले. या महिलेचे नाव आलीया शेख असून तिच्या मुलाचे नाव अयान शेख असे होते. हे कुटुंब पुण्यातील धानोरी भागात राहणारे होते. तीन दिवसांपूर्वी आबिद शेख यांनी ब्रेझा कार पिकनिकला जाण्यासाठी भाड्याने घेतली होती. हे कुटंब पिकनिकसाठी बाहेर तर पडले मात्र मंगळवारी सकाळी सासवड गावात आलीया हिचा तीक्ष्ण हत्याराने वार केलेला मृतदेह आढळून आला.

सासवड पोलिसांनी तिच्या खूनाचा तपास सुरू केला. याच दरम्यान, नवीन कात्रज बोगद्यालगत मंगळवारी संध्याकाळीच एका 8 ते 10 वर्षांच्या मुलाचाही मृतदेह आढळून आला. हा मृतदेह आलियाच्या मुलाचा असल्याचे स्पष्ट झाले. यांच्यासोबत आलियाचा पती आणि अयानचे वडील आबिद शेख सुद्धा गेले होते. पण, अजूनही त्यांचा पत्ता लागलेला नाही. त्यांनी भाड्याने घेतलेली ब्रेझा कार पुणे सातारा रस्त्यावर एका चित्रपट गृहासमोर सोडून दिल्याचे आढळून आले आहे. आबिद शेख एका कंपनीत ब्रांच मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.