आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासवड हत्या प्रकरण:संशयित आरोपी आबिद शेखचा खानापूर नदीपात्रात आढळला मृतदेह, दोन दिवसांपूर्वीच सापडले पत्नी आणि मुलांचे मृतदेह

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी आई आणि मुलाचा मृतदेह आढळला आहे

पुण्यात पिकनिकवर गेलेल्या एका छोट्या कुटुंबासोबत जे घडले त्याचा कुणी विचारही केला नसेल. आपल्या 8 वर्षांच्या मुलाला घेऊन फिरण्यासाठी निघालेल्या तरुण आई आणि वडिलांपैकी आधी आईचा मृतदेह सापडला. तिच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर तिच्या मुलाचा देखील अशाच पद्धतीने खून करण्यात आल्याचे समोर होते. याप्रकरणात पोलिसांना पतीवर संशय होता. पण, आता तीन दिवस उलटल्यानतंर संशयित आरोपी पती आबिद शेख याचाही मृतदेह खानापूर येथे नदी पात्रात सापडला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे.

मायलेकाची झाली होती हत्या
पुण्याजवळील सासवड मध्ये काल सकाळी (15 जून) एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. आता त्या महिलेच्या आठ वर्षाच्या मुलाचाही खून झाल्याचे समोर आले. या महिलेचे नाव आलीया शेख असून तिच्या मुलाचे नाव अयान शेख असे होते. हे कुटुंब पुण्यातील धानोरी भागात राहणारे होते. तीन दिवसांपूर्वी आबिद शेख यांनी ब्रेझा कार पिकनिकला जाण्यासाठी भाड्याने घेतली होती. हे कुटंब पिकनिकसाठी बाहेर तर पडले मात्र मंगळवारी सकाळी सासवड गावात आलीया हिचा तीक्ष्ण हत्याराने वार केलेला मृतदेह आढळून आला.

आदिबवर असे झाले आरोप
संबंधित प्रकरणाचा घटनाक्रम पाहता पोलिसांना आदिब यांनी आपल्या पत्नी व मुलाचा खून केल्याचा संशय होता. त्यामुळे त्याला शोधण्यासाठी पुणे पोलिसांचे सात पथक तपास करत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, आबिदने पिकनिकला जाण्यासाठी गाडी भाड्याने घेतली होती. तो सलग 11 ते 14 जूनपर्यँत घरातील कुटुंबासमवेत बाहेर फिरायला जायचे व संध्याकाळ झाली की घरी परतायचे. परंतु, 14 जून रोजी आदिब घरी परत न येता सासवड-दिवेघाट-बनेश्‍वर-बोपदेव घाट- दिवे घाटातून पुन्हा सासवडला गेला असल्याचे पोलिसांनी तपासात म्हटले. त्यानंतर त्याने रात्री साडेआठच्या सुमारास गाडीतच आलियाचा खून केल्याची शक्‍यता वर्तवली.

दरम्यान, त्याने गाडी पुन्हा कात्रज- दत्तनगर चौक-कात्रज नवा बोगदा येथे नेली. तेथे मुलाचा खून करून त्याचा मृतदेह टाकला असावा. यानंतर 15 तारखेला पहाटे एक वाजता त्याने गाडी मार्केट यार्ड येथे सोडली. तेथे गाडीतून उतरून स्वारगेटच्या दिशेने चालत जाताना तो सीसीटीव्हीत कैद झाला असे सांगण्यात येत होते. परंतु, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर तो कुठे गेला? याबाबत अद्याप काहीच समोर आले नाही... त्यामुळे या प्रकरणाचे गुढ आणखी वाढतच चालले आहे.

शेख कुटुंब मुळचे मध्यप्रदेशातील
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील आहे. 2007 पासून शेख नोकरीनिमित्त पुण्यात राहत होते. सध्या ते धानोरीतून चऱ्होलीमध्ये राहायला आले होते. आलिया शेख याही एका खासगी कंपनीत काम करत होत्या. मात्र, मुलाचा संभाळ करण्यासाठी त्यांनी अडीच वर्षांपूर्वी नोकरी सोडली होती. मुलगा ऑटिझमग्रस्त असल्याचे लक्षात आल्यावर कुटुंब तणावात होते. मागील काही महिन्यांपासून मुलाला शिकवण्यासाठी घरी एक शिक्षिकाही ठेवण्यात आली होती. आलिया शेख यांचे वडील मध्य प्रदेशात वनाधिकारी होते, तर आबिद शेख याचे वडील जिल्हा योजना नियोजन अधिकारी होते. त्याचा भाऊ कॅनडामध्ये राहत आहे.

बातम्या आणखी आहेत...