आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे फेस्टिव्हलची धूम:कार फिएस्टामधील जुन्या मोटारी बघण्यास गर्दी, महिलांची बॉक्सिंग स्पर्धा  ठरली आकर्षण

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा ‘पुणे फेस्टिव्हल कार फिएस्टा’ ही जुन्या मोटरींची विंटेज कार रॅली विशेष आकर्षण ठरली. रविवार रेसिडेन्सी क्लब येथून ही रॅली सुरु करण्यात आली. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी व मीरा कलमाडी यांनी रॅलीला प्रथम हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली.

या प्रसंगी पूनम व विशाल गोखले, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, महाराष्ट्रऑटोमोटिव स्पोर्ट्सअसोसिएशनचे अध्यक्ष व संयोजक श्रीकांत आपटे आदींनी देखील हिरवा झेंडा दाखवला.

या कुटुंबांचा सहभाग

ही विंटेज कार रॅली रेसिडेन्सी क्लब येथून निघाली पुणे कॅम्प, सदर्न कमांड, बंडगार्डन असा दहा की. मी.चा प्रवास पूर्ण करून रेसिडेन्सी क्लब येथे परतली. यामध्ये योहान पूनावाला, जहीर वकील, अमूल्य व पंकज डहाणूकर, धनंजय बदामीकर, शंतनू देशपांडे, मुंबईचे पराग राजदा, फलटणचे रघुनाथ नाईक निंबाळकर, जयसिंह मारवाह, जोनस पवार, शिरोळे कुटुंबीय आदींच्या विंटेज कार यामध्ये होत्या.

या गाड्यांचा सहभाग

बेटली (1966), मर्सिडीज (1974) मर्सिडीज (1983), फियाट (1939), फियाट (1957), फियाट (1962), वोक्सवैगन (1967), जीप, फोर्ड जीप (1942), प्लायमाउथ (1954), प्लायमाउथ (1955), प्लायमाउथ (1947), बेंटली, ऑस्टिन मार्टिन, ट्रीयंप सुपर सेव्हन (1930), मौरीस (1946), फरारी, पोर्श, शेवरलेट, बी.एम.डब्लू., हिल मिन्कस (1955), रोल्स रॉयस असे एकूण 55 विंटेज कार्स यामध्ये होत्या.

पुणेकरांची गर्दी

याचे संयोजन महाराष्ट्र ऑटोमोटिव स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत आपटे यांनी केले. पुणे फेस्टिव्हलच्या क्रीडा स्पर्धा समन्वयक प्रसन्न गोखले हे आहे. हॉटेल रेसिडेन्सी क्लब येथे बक्षीस वितरण संपन्न झाले. संपूर्ण मार्गावर विंटेज कार रॅली बघण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.

महिलांची बॉक्सिंग स्पर्धा

यंदा संपूर्ण महिलांची बॉक्सिंग स्पर्धा हे पुणे फेस्टिव्हल क्रीडा स्पर्धांमधील आकर्षण ठरले. जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडीयम येथील वस्ताद लहुजी साळवे बॉक्सिंग सेंटर येथे ही स्पर्धा संपन्न झाली. पुणे फेस्टिव्हल अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय महिलांची बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 8 वयोगटात 60 महिला बॉक्सर्सचा सहभाग होता. ‘लड़की लड़ सकती है’ हे सध्या गाजत असलेले घोषवाक्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन साठी प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष रमेश बागवे आणि माजी नगरसेवक व क्रीडा समिती अध्यक्ष अविनाश बागवे यांनी याचे आयोजन केले होते.

बातम्या आणखी आहेत...